डोंबिवलीकर मयूर कार्लेकरांचं इंग्लंडमधलं घर पेटवलं

मूळचे डोंबिवलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं इंग्लंडमधील घर वर्णभेदातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

Updated: Sep 19, 2018, 10:08 PM IST
डोंबिवलीकर मयूर कार्लेकरांचं इंग्लंडमधलं घर पेटवलं title=

केंट : मूळचे डोंबिवलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं इंग्लंडमधील घर वर्णभेदातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. १९९९ पासून कार्लेकर इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहेत. कार्लेकर, त्यांची पत्नी, पंधरा वर्षाचा मुलगा आणि नऊ वर्षाची मुलगी शनिवारी रात्री झोपलेले असताना हा प्रकार घडला. काही तरुण अचानक कार्लेकरांच्या घराजवळ आले आणि मुलांच्या खोली जवळ आग लावली.

सुदैवानं शेजाऱ्यांच्या कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केली त्यावेळी कार्लेकर कुटुंब वेळीच जागं झालं आणि पुढचा अनर्थ टळला. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एक तरूणाने कार्लेकरांच्या जळालेल्या घराचे फोटो काढले आणि फोटो काढून तो जोरजोरात हसू लागला. हा सगळा प्रकार कार्लेकरांनी ब्रिटीश पोलिसांना सांगितला. सध्य़ा ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादामुळे हा प्रकार घडल्याचा कार्लेकरांचं म्हणणं आहे.