या कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील, प्राणी जात काहीही असू द्या एकमेकांना प्रेम द्या

कुत्रा आणि बकरीची जिगरी दोस्ती! भुकलेल्या बकरीच्या पिल्लाला श्वानानं केली मदत पाहा व्हिडीओ

Updated: Jul 4, 2021, 02:51 PM IST
या कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील, प्राणी जात काहीही असू द्या एकमेकांना प्रेम द्या title=

मुंबई: कुत्रा हा माणसाचा सज्जा दोस्त आणि इमानदार प्राणी समजला जातो. याच कुत्र्याने प्राण्यांसोबतही आपली जिगरी दोस्ती निभावली आहे. त्याने बकरीच्या पिल्लासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कुत्रा हा फक्त माणसाचाच नाही तर इतर प्राण्यांचा देखील खूप चांगला सच्चा दोस्त असतो. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून हे बऱ्याचदा पाहायला मिळालं असेलच पण आता कुत्राचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कुत्र्याने भुकेलेल्या बकरीच्या पिल्लाला चक्क बाटलीमधून दूध पाजलं आहे. त्याने केलेल्या या मदतीमुळे या कुत्र्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. कुत्रा आपल्या तोंडात बाटली पकडून बाटलीच्या दुसऱ्या बाजूनं बकरीच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. 

Buitengebieden नावाच्या युझरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या युझरने कॅप्शनमध्ये गुड बॉय असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर लोकांना खूप आवडला आहे. लोकांनी हार्टचे इमोजी या व्हिडीओवर शेअर केले आहेत. 9 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिली आहे.