कधीही न बुडणाऱ्या टायटॅनिकसंबंधीत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या रंजक कहाणी

जेव्हा हे जहाज 15 एप्रिल 1912 रोजी बुडालं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या जहाजाने प्रवास करताना सर्वजण आनंदी होते, पण अचानक अपघात झाला आणि जहाज 1500 लोकांसह बुडाले. 

Updated: Mar 15, 2022, 10:26 AM IST
कधीही न बुडणाऱ्या टायटॅनिकसंबंधीत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या रंजक कहाणी title=

मुंबई : आपल्या सर्वांना टायटॅनिक जहाजाबद्दल माहितीच असेल. हे जहाज कधीही बुडणार नाही सांगितलं जायचं. परंतु जेव्हा हे जहाज 15 एप्रिल 1912 रोजी बुडालं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या जहाजाने प्रवास करताना सर्वजण आनंदी होते, पण अचानक अपघात झाला आणि जहाज 1500 लोकांसह बुडाले. हे जहाज का आणि कसे बुडाले? याबद्दल अनेक गोष्टी आजही बोलल्या जातात. परंतु त्यामागचं खरं कारण अजूनही कोणाला कळू शकलेलं नाही.

1997 मध्ये बनलेल्या प्रसिद्ध चित्रपटाच्या माध्यमातून या जहाजाच्या अनेक गोष्टी लोकांसमोर आणल्या गेल्या. परंतु तो मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेला चित्रपट होता, ज्यामुळे त्यातील सर्वच गोष्टी खऱ्या असतीलच असे नाही. आज आम्ही तुम्हाला या जहाजाशी संबंधित काही रंजक किस्से सांगणार आहोत.

टायटॅनिकची जुळी बहीण बुडाली होती, टायटॅनिक नाही

या अपघाताची एक प्रसिद्ध कथा अशी आहे की, बुडालेलं जहाज खरंतर टायटॅनिक नसून त्याची जुळी बहीण ऑलिंपिक होती. विम्याच्या पैशासाठी त्याच्या मालकांनी हा अपघात घडवून आणल्याचे बोलले जात आहे. ऑलिम्पिकचे आधीच अपघातात नुकसान झाले होते. अशा स्थितीत विम्याच्या पैशातून नुकसान भरून काढता यावे, म्हणून त्याचा अपघात करण्यात आला. मात्र, नंतर बुडणारे जहाज टायटॅनिकच असल्याचे निष्पन्न झाले.

महिला आणि मुलांना प्राधान्य

जहाज बुडाले तेव्हा महिला आणि मुलांना वाचवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. जहाजावर महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये फक्त 10 चा फरक होता. अशा परिस्थितीत महिलांना प्राधान्य दिले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. जहाजातून पळून जाणारे पहिले पुरुष होते.

ममीच्या श्रापाने बुडाले जहाज

टायटॅनिकच्या बुडण्याशी संबंधित सर्वात मोठी कथा अशी ही आहे की, या जहाजात एक शापित ममी वाहून नेली जात होती. ही ममी जिथे जाते तिथे ती मृत्यू घेऊन येते. या ममीच्या शापामुळे हे जहाज बुडाले. पण जहाजाच्या मालवाहू यादीत या ममीचे नाव नव्हते. याशिवाय ही अशुभ ममी नंतर ब्रिटिश म्युझियममध्ये दिसली.

मद्यधुंद कॅप्टनमुळे बुडाले जहाज

टायटॅनिकच्या बुडण्याशी संबंधित एका कथेनुसार, जहाजाचा कॅप्टन स्मिथचा दारूच्या नशेत हा अपघात झाला. अपघातापूर्वी त्यांनी प्रथम श्रेणीतील प्रवाशांसोबत पार्टी केल्याचे सांगण्यात आले. पण नंतर प्रवाशांनी पुष्टी केली की त्याने एक थेंबही दारू प्यायली नाही.

जर्मन बोटीवर हल्ला

टायटॅनिक बुडली नाही असंही म्हटलं जातं. त्याच्यावर जर्मन सैन्याने हल्ला करून त्याला बुडवले. जरी पहिले महायुद्ध 1914 पर्यंत सुरू झाले नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

फर्स्ट ऑफिसरने केली होती आत्महत्या

बुडत्या जहाजामुळे फर्स्ट ऑफिसर विलियम मर्डॉकने स्वत:वर गोळी कशी झाडली हे तुम्ही चित्रपटात पाहिले असेल. हे दाखवण्यात आले कारण सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी अनेकांनी याची पुष्टी केली होती. तथापि, तपासात असे दिसून आले की, जीवरक्षक बोट शेवटी जहाजातून बाहेर काढली जात असताना, हा अधिकारी लाटेसोबत वाहून गेला होता.