हॉटेलमधून भात मागवणं, एका जोडप्याला पडलं महागात, नक्की असं काय घडलं? जाणून घ्या

बाहेर फिरायला गेलं की, बाहेरचं खाणं हे येतंच. अशावेळी आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपल्या खिशाला परवडेल अशा ठिकाणी आपण जेवण जेवतो.

Updated: Jun 16, 2022, 09:51 PM IST
हॉटेलमधून भात मागवणं, एका जोडप्याला पडलं महागात, नक्की असं काय घडलं? जाणून घ्या title=

मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहे. ज्यांना बाहेर फिरायला जायला आवडतं. तसेच बाहेर फिरायला गेलं की, बाहेरचं खाणं हे येतंच. अशावेळी आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपल्या खिशाला परवडेल अशा ठिकाणी आपण जेवण जेवतो. तसे पाहाता रेस्टॉरंटमध्ये सगळ्या खाण्याच्या पदार्थांची किंमत मेन्यूकार्डवर लिहिलेली असते. ते पाहून आपण जेवण मागवतो किंवा मग आपण हे जेवण पार्सल घेऊन आपण राहात असलेल्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी घेऊन जातो.

परंतु असाच काहीसा प्रकार एका कपलने केला असता, त्यांना ते भलतंच महागात पडलं, ज्यासाठी त्यांना जास्तीचे हजार रुपये द्यावे लागले.

नक्की काय घडलं?

खरंतर सिंगापूरमध्ये एक कपल फिरायला गेलं असता, त्यांना बाहेरील रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं, परंतु ते भात आणायला विसरले. मग काय करावं असा त्यांना प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी विचार केला की, आपण राहात असलेल्या रेस्टॉरंटमधून आपण ते मागवू. साध्या स्टीम राईसला जास्त पैसे जाणार नाही. म्हणून मग त्यांनी त्यांच्या हॉटेलमधून दोन प्लेट राईस मागवला.

त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी जेव्हा या भाताचं बिल मागवलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण फक्त दोन प्लेट स्टीम राईसचे बिल त्यांना हजार रुपये आले होते. जे खरोखरंच धक्कादायक आहे.

हा कपलने त्यांचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला, ज्यावर त्यांनी त्यांनी त्यांच्या बिलचा फोटो देखील शेअर केला होता.

हा बिलमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये हॉटेलने त्यांच्याकडून भातासोबत, सर्व्हिस चार्ज आणि टॅक्स वसूल केला आहे.

तुम्हाला देखील अशीच मेन्यू कार्ड न पाहाता गोष्टी ऑर्डर करण्याची सवय असेल, तर तुम्ही लगेच सावध व्हा आणि अशा फसवणूकीपासून लांब राहा.