आता रस्त्यावरुन चालताना 'Third eye' तुम्हाला अपघातांपासून वाचवणार, कसे ते जाणून घ्या

28 वर्षीय पेंग मिन-वूक नावाच्या व्यक्तीने एक आयबॉल तयार केला आहे,

Updated: Jul 16, 2021, 04:04 PM IST
आता रस्त्यावरुन चालताना 'Third eye' तुम्हाला अपघातांपासून वाचवणार, कसे ते जाणून घ्या title=

(दक्षिण कोरिया) सेऊल : दक्षिण कोरियाच्या एका औद्योगिक डिझायनरने नेहमी स्मार्टफोनवर असणार्‍यांसाठी एक खास डिव्हाइस तयार केले आहे. या डिव्हाइसमुळे लोकं जरी रस्त्यावर चालत असले तरीही. बरेचदा लोकं फोनमध्ये इतके व्यस्त असतात की, समोर काय चालले आहे हे त्यांना माहित नसते. तुम्हाला माहित असेल की, मोबाईलमुळेही बहुतेक वेळा मोठमोठे अपघात झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन डिझायनरने हे डिव्हाइस बनवले ज्याला नाव दिले 'द थर्ड आय'. या डिव्हाइसवर डिझायनरने असा दावा केला की, यामुळे अपघात टाळता येतील आणि हे उपकरण सहज हाताळता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

द थर्ड आय नावाचा रोबोटिक आयबॉल

एका मीडिया अहवालानुसार, 28 वर्षीय पेंग मिन-वूक नावाच्या व्यक्तीने एक आयबॉल तयार केला आहे, ज्याला त्याने 'थर्ड आय' असे नाव दिले आहे. स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती हे डिव्हाइस आपल्या कपाळावर लावून रस्त्यातून चालू शकतात आणि गोष्टी ब्राऊज करु शकतात.

हे डिव्हाइस डोक्यावर पाहिल्यानंतर, जेव्हा ती व्यक्ती मोबाईल पाहण्यासाठी डोकं खाली करेल तेव्हा हा तिसरा डोळा उघडेल. त्यानंतर तुमच्या रस्त्यात कोणताही धोका असल्यास किंवा कोणतीही गोष्ट असल्यास हा डिव्हाइस बीप करेल आणि त्याव्यक्तीला चेतावणी देईल.

रॉयल कॉलेज ऑफ आर्ट अँड इम्पीरियल कॉलेजमधील इनोव्हेशन डिझाईन इंजिनिअरिंगमधील पदवीधर पेंग मिन-वूक यांनी रॉयटर्सला सांगितले, "आपण माणसं स्मार्टफोनवरुन नजर हटवत नाही, अशा परिस्थितीत एक अतिरिक्त डोळ्याची आपल्याला भविष्यात आवश्यकता आहे."

असे कार्य करेल

रोबोटिक डोळा आणि कोणत्याही अडथळ्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरकर्त्याच्या गळ्यातील तिरकस कोन आणि अल्ट्रासोनिक सेन्सर मोजण्यासाठी  गॅयरो सेन्सर वापरतो. हा रोबोटीक डोळा त्याच्या समोरील गोष्टीमधील अंतराची गणना करतो. दोन्ही सेन्सर बॅटरी पॅकसह ओपन-सोर्स सिंगल-बोर्ड मायक्रोकंट्रोलरला जोडलेले आहेत.