पाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य

अमेरिकेने लष्करासाठी केली जाणारी आर्थिक मदत रोखल्यानंतर पाक आक्रमक झालाय.

Updated: Jan 11, 2018, 09:34 PM IST
पाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य title=

इस्लामाबाद : अमेरिकेने लष्करासाठी केली जाणारी आर्थिक मदत रोखल्यानंतर पाक आक्रमक झालाय.

पाकिस्तान आक्रमक

पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेत अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य थांबवले आहे. हा निर्णय जाहीर करताना पाकिस्तानने अमेरिकेने आम्हाला धमकावणं बंद करावं असं म्हटलं आहे.

अमेरिकेने आवळल्या नाड्या

अलिकडेच अमेरिकेने पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या कारणावरून पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखली आहे. २५५ मिलियन डॉलर्सची मदत अमेरिकेने रोखून ठेवली आहे. त्यामुळेच पाकिस्तान बिथरला आहे. 

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

आम्ही दहशतवादाविरुद्द लढत आहोत. यात आमचं खूप आर्थिक आणि मानवी नुकसान झालंय. अल् कायदाला अमेरिका पाकिस्तानच्या सहकार्यविना संपवू शकली नसती, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

दहशतवादाला खतपाणी सुरूच

पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याचा धोरणाचा सर्व जगात निषेध केला जातोय.
आपल्या धोरणात बदल करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. तिथे दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. उलट भारत आणि अफगाणिस्तानात घातपात घडवून तिथे अस्थिरता निर्माण करण्याचंच पाकिस्तानचं धोरण आहे.