गौप्यस्फोट : चकवा देण्यासाठी दाऊद वापरतोय 'बिटकॉईन'

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

Updated: Nov 29, 2017, 03:48 PM IST
गौप्यस्फोट : चकवा देण्यासाठी दाऊद वापरतोय 'बिटकॉईन' title=

मुंबई : कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

दाऊदचा एकुलता एक मुलगा मोईन मौलाना बनलाय, असं सांगून इक्बालनं आधीच खळबळ उडवून दिलीय. आता भारतीय सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी दाऊदनं बिटकॉइन या डिजीटल चलनाचा वापर सुरू केलाय, असा दावा त्यानं केलाय.

काय आहे बिटक्वॉइन?

बिटक्वॉइनची सुरूवात जानेवारी २००९ मध्ये झाली होती. या व्हर्चुअल करन्सीचा वापर करून जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही पेमेंट केले जाऊ शकते. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या पेमेंटसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही.

बाजारात एका बिटक्वॉईनची किंमत आता १० हजार डॉलर इतकी झाली आहे. म्हणजे भारतीय रूपयात एका बिटक्वॉईनची किंमत ६ लाख ४५ हजार रूपयांपेक्षाही जास्त आहे. 

बिटक्वॉइनमुळे दोन लोकांमध्ये सहज ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं. या दोन लोकांमध्ये ओळख असणेही गरजेचे नाहीये. तसेच ही देवाण-घेवाण करण्यासाठी कोणत्याही बॅंकेची गरज नाही. एकदा बिटक्वॉइनच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन केल्यास कॅन्सल करता येत नाही.