लिहिताना अल्पविराम विसरला, भरला लाखो रूपयांचा दंड

 लिहिताना विरामचिन्ह टाकायला विसरल्याने या कंपनीला चक्क ५ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम कामगारांना (वाहन चालक) दंडापोटी द्यावी लागणार आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 11, 2018, 11:23 AM IST
लिहिताना अल्पविराम विसरला, भरला लाखो रूपयांचा दंड title=

वॉशिंग्टन: मनातील भाषेचे विचार लिखीत स्वरूपात कागदावर उतरवताना विराम चिन्हांना प्रचंड महत्त्व असते. पण, हे महत्त्व न कळल्याने झालेली चूक अमेरिकेतील एका कंपनीला भलतीच महागात पडली आहे. लिहिताना विरामचिन्ह टाकायला विसरल्याने या कंपनीला चक्क ५ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम कामगारांना (वाहन चालक) दंडापोटी द्यावी लागणार आहे. अर्थात, कंपनीनेही ही रक्मक  देण्याची तयारी दर्शवली आहे.

कंपनीला न्यायालयाचा निर्णय मान्य

ही घटना घडली आहे अमेरिकेतील ऑखर्स्ट डेयरी या कंपनीसोबत. गेल्या वर्षी यूनायटेड स्टेस्ट कोर्ट ऑफ अपील्सने  म्हटले होते की, अल्पविराम (कॉमा) नसल्यामुळे कंपनीच्या संदेशात अनिश्चितता निर्माण होत आहे. त्यामुळे ही बाब कामगारांच्या (चालकांच्या) बाजूने जाते. त्याला नाकारता येणार नाही. कंपनीनेही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करत न्यायालयाने ठरवून दिलेली रक्कम चालकांना देण्याचे कबूल केले.

काय आहे प्रकरण?

कंपनीचे वाहन चालक आणि कंपनी यांच्यात एका ओव्हरटाईमच्या रकमेवरून न्यायालयात वाद सुरू होता. २०१४ मध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. तीन वाहन चालकांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल चार वर्षे सुनावनी झाल्यावर न्यायालयाने आपला निर्णय दिला. एक अल्पविराम ( कॉमा) नसल्यामुळे चालकांना कंपनीच्या संदेशाचा अर्थ समजून घेणे कठीण झाले. त्यामुळे त्यांच्या मनात संदेश समजन्याबाबत अनिश्चितता आणि संभ्रम तयार झाला. न्यायालयाने या प्रकरणात कंपनीविरोधात चालकाच्या बजूने निर्णय दिला. तसेच, संदेशामध्ये कोणत्या ठिकाणी अल्पविराम देण्याची आवश्यकता होती हेही कंपनीला सांगितले.