Covid 19 : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आशिया (ASIA) आणि युरोप (EUROPE) मधील अनेक देश कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेचा (corona Forth Wave) सामना करत आहेत. नवीन रुग्णांमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण कोरोनाचा ओमायक्रॉन BA.2 व्हेरिएंट (Omicron) असल्याचे मानले जात आहे. संकटाच्या या काळात संशोधकांना कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार XE व्हेरिएंट (XE Verient) ही आढळला आहे.
सर्वात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा हा दहापट वेगाने पसरतोय. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत माहिती दिली आहे. Omicron च्या BA.1 आणि BA.2 प्रकारांचे XE हा संयोजन असल्याचे WHO ने म्हटले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता हा किती प्राणघातक आहे हे सांगणे आता कठीण आहे परंतु त्याची लक्षणे जाणून घेतल्यास याचा संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते. कोरोनाचा हा नवीन प्रकार आणि त्याची लक्षणे जाणून घेऊया.
XE स्ट्रेन Omicron च्या BA1 आणि BA2 चे संयोजन आहे. म्हणजेच हा विषाणू या दोघांपासून बनलेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रकारांचा संसर्ग होतो तेव्हा असे होते. आतापर्यंत, XE स्ट्रेनने यूकेमध्ये 637 लोकांना संक्रमित केले आहे. याशिवाय इतर ठिकाणी असे प्रकार आढळून आलेले नाहीत.
कोविडची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात. कोणतीही लक्षणं दिसली की त्याकडे दुर्लक्ष करु नका, जेणेकरून संसर्गाची तीव्रता टाळता येईल. कोरोना विषाणूचा बर्याच लोकांवर सौम्य प्रभाव पडतो. तर काही लोकांना तो गंभीर करतो.