Israeli airport News : पोटच्या पोरांवार आई आणि वडिलांचा जीव असतो. मुलांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी आई बाप जिवाचं रान करतात. परंतू, काही अशा धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळतात, ज्यामुळे तुम्हालाही शॉक बसेल. अशीच एक घटना इस्त्रायलच्या विमानतळावर घडली आहे. तुमच्या मुलाचंही तिकीट लागेल, असं एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर आई वडिलांनी असं काही तरी केलंय, की शत्रु देखील असं काही करणार नाही. नेमकं काय झालं? आई वडिलांनी पोटच्या पोरासोबत असं का केलं? पाहुया
झालं असं की, बेल्जियन पासपोर्ट असलेल्या एका जोडप्यांना तेल अवीव ते ब्रुसेल्सच्या फ्लाइटमध्ये चढायचे होते. पण या जोडप्यांकडे फ्लाईटचं तिकीट नव्हतं. त्यांनी मुलासाठी तिकीट विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे जोडपं टेन्शनमध्ये आलं. जायचं तरी कसं? अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यांनी अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला आणि ते पासपोर्ट नियंत्रणाकडे जात असताना त्यांच्या बाळाला स्ट्रोलरमध्ये सोडले होते. या जोडप्याने आपल्या लहान बाळाला इस्रायली विमानतळ चेक-इनवर सोडलं (Couple leave baby at Israeli airport) आणि रायनएअरच्या फ्लाइटमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
विमानतळ कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं अन् पालकांचा शोध घेतला. तेल अवीवमधील बेन-गुरियन विमानतळावर चेक-इनवर बाळाला सोडल्यानंतर बेल्जियन पासपोर्ट असलेल्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन् त्यांची चौकशी केली. आम्ही असे काहीही पाहिले नाही. आम्ही जे पाहत होतो त्यावर आमचा विश्वास बसत नव्हता, असं विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. चेक-इन काउंटर बंद झाल्यानंतर हे जोडपे टर्मिनल वन वर उशिरा पोहोचले होते, असंही इस्रायल विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भारतात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता हवाई वाहतूक कंपन्यांना 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना त्याच्या पालकाच्या बाजूलाच सीट द्यावं लागणार आहे. आधी पालकांना मिळालेल्या सीटच्या बाजूचे सीट हवी असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती. अशातच आता पालकांना अडचण होऊ नये म्हणून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मुलांना पालकांसोबत कमीत कमी एक सीट दिले पाहिजे. त्याची नंतर नोंद ठेवली पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत.