मुंबई : गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे लोकं त्रस्त आहेत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. तर स्पेनमध्ये दिलासा देणारं दृष्य पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसचं आहे. स्पेनमध्ये 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपला आहे. त्यामुळे तेथील नागरिक रस्त्यांवर उतरून आनंद व्यक्त करत आहेत. अखेर सहा महिन्यांनंतर स्पेनच्या रस्त्यांवर वर्दळ दिसत आहे. या आनंदी क्षणाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये कपल रस्त्यावर किस करताना दिसत आहे. लॉकडाऊन संपल्याचा उत्साह सोशल मीडियावर व्यक्त करण्याचा मोह स्पेनमधील नगरिकांना आवरला नाही.
Street parties in Spain as couples kiss and hundreds dance to mark lockdown end https://t.co/1qt8kqK7VY pic.twitter.com/4CjkOppuwd
— The Mirror (@DailyMirror) May 10, 2021
SEALED WITH A KISS Couple celebrate end of Spain’s covid lockdown with kiss as thousands party in the streets to big farewell to bug pic.twitter.com/eeb0IC82wF
— jobadvisor.link (@JobadvisorL) May 10, 2021
पण कोरोनाचं सावट अद्याप टळलेलं नाही त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. लॉकडाऊन संपलं तरी काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला गर्दी देखील दिसत आहे. पण ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस देखील त्याठिकाणी दाखल आहेत.