पॅरिस : कोरोनाने गेल्या दोन वर्षात पुरता हैदोस घातला आहे. अनेकांच्या जवळच्या व्यक्ती या कोरोनानं हिरवाल्या. आता वर्ष सरताक्षणी कुठे परिस्थिती नियंत्रणात येते वाटत होतं. तेच पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. एकीकडे नव्या व्हेरिएंटचे वाढते रुग्ण तर दुसरीकडे झपाट्याने वाढणारा आकडेवारी फार भयंकर आहे.
गेल्या 3 दिवसात एका देशानं सर्वात वाईट रेकॉर्ड केला आहे. या देशात 24 तासात कोरोनाचे पुन्हा 1 लाख पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलं आहे. वर्ष सरतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याने आता पुन्हा एकदा सतर्क आणि सावध राहाणं गरजेचं आहे.
4 डिसेंबरला नव्या रुग्णांची संख्या 50 हजारहून अधिक झाली होती. आता फ्रान्समध्ये 1 लाख 22 हजार रुग्ण नवे सापडत आहेत. तर 546 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तिथल्या आरोग्य यंत्रणाने वृद्धांना तीन महिन्यांनी बुस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. तिथल्या प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. मात्र नव्या वर्षाआधी फ्रान्समध्ये आकडा वाढल्याने जगाचं टेन्शन वाढलं आहे.