'कोरोना' संकटात चीनचा मनी प्लान, 'आर्थिक महासत्ते'कडे वाटचाल

 चीनच्या अब्जोपतींना यामुळे फायदा झाला

Updated: Apr 21, 2020, 09:03 AM IST
'कोरोना' संकटात चीनचा मनी प्लान, 'आर्थिक महासत्ते'कडे वाटचाल title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात जगभरात पीपीई सप्लाय करणारा चीनने आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला मागे टाकण्याची तयारी सुरु केल्याचे दिसतेय. जगातील टॉप १०० अब्जोपतींमध्ये केवळ चीनच्या अब्जोपतींची संपत्ती वाढली आहे. त्यामुळे जगभरात हाहाकार माजणार आहे हे चीनला आधीच माहिती होतं का ? अशी शंका उपस्थित होत आहे. 

जगभरातील बाजारपेठा, मशिन्स, कारखाने बंद असले तरी जगाला कोरोनाने लॉक करणारं चीन स्वत: अनलॉक झालं आहे. चीनने जगभरातील ५० हून जास्त देशांमध्ये ३.६० अब्ज मास्क विकले आहेत. ३.७ अब्ज प्रोटेक्टीव्ह क्लोदींग आणि २०.८४ लाख कोरोना टेस्ट किट चीनने जगाला निर्यात केले. 

चीन जगभरातील देशांतून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करत आहे. कोरोना वायरसमुळे जगभरातील श्रीमंतांना फटका बसला. पण चीनच्या अब्जोपतींना यामुळे फायदा झाला.

चीनमध्ये अब्जोपती वाढले

कोरोनाच्या या काळात जगातील १०० टॉप अब्जोपतींमध्ये केवळ ९ टक्के जणांची आर्थिक स्थिती सुधारली. हे सर्व चीनचे आहेत. चीनची संस्था 'हू-रन' ने केलेल्या एक संशोधनातून हे समोर आले आहे. इतर देशांतील ८६ टक्के अब्जोपतींची संपत्ती पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. तर ५ टक्के अब्जोपतींच्या आर्थिक स्थितीत कोणता बदल झाला नाही. जगातील १०० टॉप अब्जोपतींमध्ये चीनचे ६ नवे श्रीमंत आहेत. तर भारताचे ३ आणि अमेरिकेचे २ जण या लिस्टमधून बाहेर फेकले गेले आहेत.

चीनचा मनी प्लान 

कोरोना संकटात चीनच्या मनी प्लानची शंका कोणालाच आली नाही. तीन महिन्यानंतर चीनमधून तर कोरोना संपला आहे. पण इतर देश मदतीसाठी चीनचे दरवाजे ठोठावत आहेत.