China Lockdown: देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. नवीन रुग्णांची संख्या 500 हून कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात (India Corona) गेल्या 24 तासांत 406 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये ( China Corona) पुन्हा एकदा कोरोनाचा कहर ( Coronavirus Rises ) पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस येथील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन ( Lockdown ) लावण्यात आलं आहे.
अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये महामारी सुरू झाल्यापासून कोरोना (corona virus) रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार (corona update) रोखण्यासाठी चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नॅशनल हेल्थ ब्युरोने सांगितले की चीनमध्ये बुधवारी 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27,517 मध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या पाहिली तर हा आकडा खूपच कमी असला तरी त्यामुळे चीनमध्ये (china coron case) भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये 29,390 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
वाचा: Meta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
झिरो कोविड पॉलिसी
चीनच्या झिरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) अंतर्गत एखादा कोरोनाचे रुग्ण (corona) आढळल्यास संपूर्ण शहर लॉकडाऊन (Lockdown) केले जाते. तसेच कोविड पीडिताच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कडक क्वारंटाईनमध्ये (Quarantine) ठेवले जाते. चीनमध्ये कोरोनाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. शून्य कोविड (Zero Covid Policy) धोरणामुळे लोकांमध्ये संताप आहे. याबाबत लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोनामुळे त्याच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला आहे.
तसेच चीनच्या ग्वांगझूमध्ये (Guangzhou) दररोज कोरोनाचे 8 हजार रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने बैयून जिल्ह्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. बीजिंगमधील नवीन कोरोना निर्बंधांमुळे सोमवारी आशियातील जवळपास सर्व शेअर बाजार कोसळले.
चाओयांगवर सर्वाधिक हिट
मंगळवारी बीजिंगमध्ये कोरोनामुळे (Corona in Beijing) दोन जणांचा मृत्यू झाला. यानंतर अधिकाऱ्यांनी उद्याने, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्याचे आदेश दिले. बीजिंगचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला चाओयांग जिल्हा पूर्ण लॉकडाउनच्या जवळ पोहोचला आहे. तिथे लोकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आले आहे. चाओयांग जिल्ह्यात सुमारे 3.5 दशलक्ष लोक राहतात. कोरोनाच्या नवीन रुग्णांचा सर्वाधिक फटका इली भागात बसला आहे. सोमवारी, बीजिंगमध्ये 1,400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 783 प्रकरणे एकट्या चाओयांगमध्ये आढळली.