Covid 19 Test | तुमचा मोबाईलच सांगणार तुम्हाला कोरोना झालाय की नाही?

संशोधकांनी एक नवीन पद्धत विकसित केली आहे.

Updated: Jun 24, 2021, 10:15 PM IST
Covid 19 Test | तुमचा मोबाईलच सांगणार तुम्हाला कोरोना झालाय की नाही? title=

मुंबई :  कोरोना झालाय (Corona virus) की नाही, हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. ज्यामध्ये स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून स्वॅब घेतला जाणार आहे. त्यानुसार कोरोना आहे की नाही, याचं निदान होणार आहे. युके युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी, स्मार्टफोनच्या स्क्रीनवरुन घेतलेल्या स्वॅबचे विश्लेषण (Coronavirus Test Smartphone Screen) केले आहे. डॉक्टरांना आढळलं की आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्टमध्ये संक्रमित सापडले, तेच स्मार्टफोन स्क्रीनवरून घेतलेल्या swab चाचणीतही पॉझिटिव्ह आले. (Corona Test Could be Possible From Your Smartphone)      
 
मंगळवारी ई-लाइफ जर्नलमध्ये या नवीन पद्धतीबाबत सांगण्यात आलं. या पद्धतीमुळे 81 ते 100 संक्रमित लोकांच्या स्मार्टफोनवर विषाणू आढळले. ज्यामुळे अचूक चाचणी (Covid-19 Test Latest Developed Method) असल्याचे सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी सांगितले की या पद्धतीनुसार नमुने गोळा करण्यास एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही गरज भासत नाही. ही पद्धत कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते.
 
गरिब देशांसाठी फायदेशीर 

"कमी उत्पन्न असलेल्या देशांवर कोरोनामुळे  (Coronavirus Pandemic)   गंभीर परिणाम झाले. या सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल मलाही  काळजी होती. ", असं  यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मोलॉजीच्या (ucl institute of ophthalmologi) रॉड्रिगो यंग यांनी स्पष्ट केलं. या पद्धतीमुळे कोव्हिड 19 चाचणी करणं सुलभ आणि सोयीचे ठरेल. भविष्यात साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही या पद्धतीचा उपयोग केला जाऊ शकतो. या पद्धतीनुसार, डायग्नोसिस बायोटेकद्वारे तपासणीसाठी एक मशीन तयार केली जात आहे.
 
संक्रमणावर नियंत्रण मिळवणं सोप्पं 

कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील देशांमध्ये पुन्हा एकदा चिंता निर्माण झालीय. लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या देशांमध्येही  आता कोरोना नवा प्रकार आढळून येत आहे.  तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा प्रकरणे वाढण्याची भीती आहे. तज्ज्ञांनुसार, कोणतीही लस 100% प्रभावी नाही. अशा परिस्थितीत स्मार्टफोनसह असलेली ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते. त्याच्या वापरासह विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी त्याचे नियंत्रण केले जाऊ शकते.
 
संबंधित बातम्या :

Corona | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढऊतार कायम, 'या' जिल्ह्याचा आकडा वाढताच

सावधान, या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट

बापरे... राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला