मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron variant) आता राज्यात शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळलाय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच ओमायक्रॉनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक मोठा दिलासा दिलाय. या व्हेरियंटबाबत WHOनं नेमकं काय म्हंटलंय, पाहूयात. (corona new variant omicron who chief scientist soumya swaminathan reaction)
साऱ्या जगानं ओमायक्रॉनची प्रचंड धास्ती घेतलीये. डेल्टापेक्षा सातपट वेगानं ओमायक्रॉन पसरतोय. असं असलं तरी जागतिक आरोग्य संघटनेनं एक दिलासा देणारी बातमी दिलीये. ओमायक्रॉनचा फैलाव वेगानं होत असला तरी अजूनपर्यंत एकही मृत्यू नोंद झालेली नाही असं WHO च्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय.
काय म्हणाल्या सौम्या स्वामीनाथन?
आत्तापर्यंत 38 देशांमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. मात्र या देशांमध्ये ओमायक्रॉनमुळे एकाही रूग्णाचा मत्यू झाल्याची नोंद नाही. ओमायक्रॉनबाबत घाबरून जाऊ नका. तसंच लसींमध्ये बदल करण्यासाठी घाई करण्याची गरज सध्या तरी वाटत नाही.
ओमायक्रॉनच्या धास्तीनं पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतं की काय, अशी भीती व्यक्त होतेय. अशात WHOनं सर्वांना मोठा दिलासा दिलाय. अर्थात याचा अर्थ सगळ्यांनी नव्या व्हेरियंटकडे दुर्लक्ष करावं असा मुळीच नाही.
ओमायक्रॉनची भीती बाळगण्याचं कारण नसलं तरी पूर्ण गाफील राहूनही चालणार नाही, असंच सगळे सांगतायत. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या नात्यानं आपण कोविड प्रोटोकॉल पाळूयात आणि ओमायक्रॉनला दूर ठेवूयात.