जगभरात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटींवर

कोरोना रुग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे.

Updated: Jul 6, 2020, 10:18 AM IST
जगभरात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटींवर  title=

नवी दिल्ली : जगभरात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटींवर पोहोचली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे 5.29 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 63.45 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

शनिवारी जाहीर झालेल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, चीनच्या वुहान शहरापासून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरात थैमान घालतो आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या 27 लाखावर गेली आहे. तर 1.29 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझील हा प्रभावित देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथे कोरोना रूग्णांची संख्या 1.49 लाखांवर गेली आहे. तर देशातील 61,844 लोकांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन असूनही, अमेरिका, भारत, डेन्मार्क आणि इटलीसह जगभरातील देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. आता मात्र लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे.