कोरोनाचे संकट : जपानमध्ये सात प्रदेशांत आणीबाणी जाहीर

 जपामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.  

Updated: Apr 8, 2020, 02:47 PM IST
कोरोनाचे संकट : जपानमध्ये सात प्रदेशांत आणीबाणी जाहीर title=

टोकियो : कोरोना व्हायरसचे संकट जगावर पसरले आहे. आता जपामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जपानने टोकीयोसह देशातल्या सात प्रदेशांमध्ये एका महिन्याची आणीबाणी जाहीर केली आहे. या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झाल्याचे आढळून आले आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. जपानमध्ये आता आणिबाणी ही  ६ मेपर्यंत लागू असणार आहे. याअंतर्गत लोकांना घरीच राहण्याची विनंती करण्यात आली आहे.  

चीननंतर जपानमध्येही आता कोरोनाचा मोठा धोका उद्भवला आहे. चीनमध्ये ज्या ठिकाणाहून कोरोनाचा प्रसार जगात झाला त्या वुहान येथे आजपासून लॉकडाऊन उठविण्यात आले आहे. मात्र, जपानवरील धोका वाढताना दिसत आहे. जगात अमेरिका, इटली, फ्रान्स याठिकाणी कोरोनाचा जोरदार फैलाव होत आहे. त्यामुळे धोका वाढता दिसून येत आहे. जपानमध्येही हीच परिस्थिती सध्या दिसत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे टोकयो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आली. टोकयो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२१ साली २३ जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्ट २०२१ ला या ऑलिम्पिकची सांगता होईल. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे टोकयो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.