नवी दिल्ली : चीनने (China) पुन्हा एकदा भारताला (India) डिवचले आहे. झिंनजियान प्रांतात भारतीय सीमेजवळ चीनी सैन्याचा युद्धाभ्यास एकीकडे भारताशी शांत आणि वाद वर तोडगा करणाऱ्या चीननं आपला खरा चेहरा समोर आला आहे.
चिनी (China) पीपल्स लिबरेशन आर्मीने (Liberation Army) भारताच्या सीमेजवळील झिंजियानच्या उंचीवर 16,000 फूटांवर रात्रीचा लढाईचा सराव केला. दोन्ही देशांच्या पूर्व लडाखमध्ये सीमेवरील वाद सुरुच आहे. तो सोडवण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून चर्चा सुरु आहेत. असे असताना हा युद्ध सराव चीनकडून करण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. (Chinese People's Liberation Army carried out a night battle exercise at over 16,000 feet on the heights of Xinjiang, near the Indian border)
पूर्व लडाख जवळ असणाऱ्या चीनच्या झिंजियान प्रांतात चीन सैन्य पुन्हा एकदा युद्धाभ्यास केला. विशेष म्हणजेहा युद्धाभ्यास मध्यरात्री काळोखात करण्यात आला आहे. साधारण वर्षभरापूर्वी गलवान खोऱ्यात चीन सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चीनचा खरा चेहरा पुढे आला आहे.
मध्यरात्रीच्या अंधारात भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यासमोर चीनला माघारी जावे लागले होते. त्यारात्री भारताचे 20 सैनिक शहीद झाले. पण चीनच्या सैन्यदालतील अनेक सैनिकांनाही ठार मारण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. पण चीनने आपले किती सैनिक यावेळी मारले गेले याचे आकडे कधीच उघड केलेले नाहीत. चीन सैनिकांची हारकिरी आणि भारतीय लष्कारचे शौर्य लक्षात घेऊनच यावेळी चीनने मिट्ट काळोखात युद्धाभ्यास केल्याचे आता बोलले जात आहे.