नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या ट्रेड वॉरचा मोठा फटका चीनची सर्वात श्रीमंत महिला झू कुनफेई हिला बसलाय. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या वादादरम्यान तिच्या संपत्तीत ६६ टक्के घट झालीय. झू कुनफेई यांच्या संपत्तीत तब्बल ६.५ अरब डॉलर म्हणजेच जवळपास पाच हजार करोड रुपयांची घट झालीय.
झू कुनफेई यांची कंपनी लेन्स टेक्नॉलॉजी अॅप्पल आणि टेस्ला यांच्यासाठी टचस्क्रीन बनवते. लेन्स टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्येही यंदा ६२ टक्क्यांनी घट झालीय.
अमेरिका-चीन दरम्यान सुरू असलेल्या ट्रेड वॉरचा फटका अनेक चीनी अरबपतींना बसलाय. अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा आणि टेनशेट हॉल्डिंग्सचे सीईओ मा हुतेंगही यापासून वेगळे राहू शकलेले नाहीत.
जगातील ५०० श्रीमंतांमध्ये सहभागी असलेल्या चीनी व्यावसायिकांना यंदा आत्तापर्यंत एकूण ८६ अरब डॉलरचं नुकसान झालंय.
चीनची सर्वात श्रीमंत महिला झू कुनफेई यांचा जन्म १९७० साली हुनान प्रांतातील शियांगमधला... आपली कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी सहा वर्ष एका ग्लास फॅक्टरीमध्ये काम केलं.