Rs 12 Crore Lottery: चीनमध्ये (China) एक अजब प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चीनमधील एका व्यक्तीला त्याच्या पत्नीला लाखो युआनची (चिनी चलन) भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यक्तीने 10 मिलियन युआन (भारतीय चलनानुसार 12 कोटी 13 लाख रुपयांची) लॉटरी जिंकल्यानंतर ही महिती पत्नीपासून लपवून ठेवली होती. त्याच प्रकरणात त्याला आता पत्नीला पैसे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार झुओ अडनाव असलेल्या या व्यक्तीला 2 वर्षांपूर्वी ही जॅकपॉट लॉटरी लागली होती. सर्व कर आणि इतर रक्कम कापून झुओला 8.43 मिलियन युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 10 कोटी 22 लाख रुपये मिळाले होते. मात्र त्याने ही गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवून ठेवली. या महिलेचं अडनाव लीन असं असल्याची माहिती समोर आली आहे.
झुओला मिळालेली लॉटरीची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर त्याने त्यापैकी दोन मिलियन युआन म्हणजेच 2.42 कोटी रुपये आपल्या मोठ्या बहिणीच्या खात्यावर पाठवले. 'द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांनंतर या व्यक्तीने 7 लाख युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 84.93 लाख रुपये आपल्या बँक खात्यातून काढून आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला घर विकत घेण्यासाठी मदत म्हणून दिले.
आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल लीनला समजल्यानंतर तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. तिने या अर्जामध्ये झिओच्या सर्व संपत्तीचं समानपणे वाटप व्हावं अशी मागणी केली आहे. तसेच या महिलेने कोर्टाकडे आपल्या पत्नीने जिंकलेल्या रक्कमेपैकी दोन तृतीयांश रक्कम म्हणजे 2.7 युआनपैकी दोन तृतीयांश युआन आपल्याला देण्यात यावेत असीही मागणी केली आहे. पती, त्याची बहणी आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने आपल्या नकळत हा पैसा वापरल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पूर्व चीनमधील झेनहींग प्रांतामधील वेनझुहूमधील कोर्टाने या प्रकरणामध्ये निकाल दिला आहे. पतीने परस्पर बहिणीला आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीला दिलेली रक्कमेवर सध्याच्या पत्नीचाही तेवढाच हक्क होता. तिच्या नकळत झालेले हे व्यवहार तिच्यावर झालेला अन्याय आहे. जोडप्याच्या एकत्रित संपत्तीमधून पतीने चोरी केल्यासारखा आहे प्रकार आहे असं न्यायाधिशांनी निकाल वाचून दाखवताना म्हटलं. तसेच आता हाती आलेल्या लॉट्रीच्या रक्कमेमधून 60 टक्के रक्कम म्हणजेच 6 कोटींहून अधिक रुपये द्यावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
चीनमधील सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे. अनेकजण दोन्ही बाजूने यावर मतं मांडत आहेत. एकाने याच कारणामुळे मी लग्न करत नाही अशी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर अन्य एकाने दोघांनी कमवलेल्या पैशांमधून पतीने लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. त्यानंतर पैसे जिंकल्यावर ते त्याला एकट्यालाच हवे होते. हे चुकीचं आहे, असं मत नोंदवलं आहे.