कोरोनाच्या संकटात चीन परदेशात वाढवतोय गुंतवणूक

भारतात चीनची मोठी गुंतवणूक

Updated: Apr 12, 2020, 06:13 PM IST
कोरोनाच्या संकटात चीन परदेशात वाढवतोय गुंतवणूक title=

नवी दिल्ली : चीनची केंद्रीय बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) ने मार्चच्या तिमाहीमध्ये भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. चीनने एचडीएफसी लिमिटेडमध्ये एक मोठा भाग मिळवला आहे. पीबीओसीने एचडीएफसीचे 1.75 कोटी शेअर खरेदी केले आहेत.

जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान हा चीनने हे शेअर घेतले. चीनच्या या बँकेने 1,74,92,909 कोटी शेअर खरेदी केले आहेत. ज्यामुळे त्यांना 1.01 टक्के भाग मिळाला आहे.

मागील काही आठवड्यांपासून एचडीएफसी लिमिटेडचे शेअर पडत होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेअर कमी होण्यास सुरुवात झाली. जी 41 टक्क्यांपर्यंत खाली आली. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांनी म्हटलं की, मार्च 2019 पर्यंत पीपल्स बँक ऑफ चायनाकडे 0.80 टक्के भाग शेअर होते. आता मार्च 2020 पर्यंत आणखी 0.20 टक्के वाढ झाली आहे.

जेव्हा जेव्हा प्रमुख अर्थव्यवस्थेचे शेअर खाली पडत आहे. तेव्हा चीन आशिया खंडातील वित्तीय संस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. चीनने काही वर्षांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशात कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कमजोर पडत असताना महत्त्वाच्या वित्तीय संस्थांमध्ये चीन गुंतवणूक करत आहे.