बीजिंग : एका पाठोपाठ आलेल्या भूकंपांनी चीन हादरलं आहे. आज सकाळी चीनच्या चिंगहई प्रांतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. 7.3 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती मिळतेय. या भूकंपाचे केंद्र सेन्ट्रल चीनमध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर होते.
भूकंपाने हादरला चीन
याआधी शुक्रवारी रात्री चीनमध्ये भूकंप आला होता. हा भूकंप दक्षिण-पश्चिम परिसरातील सीमेला लागून असलेल्या युन्नान प्रांतात आला होता. या भूकंपात तीन लोकांचा मृत्यू आणि 27 लोक जखमी झाले होते.
भूकंपाचे केंद्र
अमेरिकेच्या जिओल़ॉजिकल सर्वेच्या मते, शुक्रवारी रात्री चीनच्या युन्नान प्रांतात आलेल्या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र उत्तर - पश्चिमेतील दाली शहर होते.
चीनच्या या परिसरात नेहमीच भूकंप येत असतात. त्यामुळे रहिवाशांचे नेहमी नुकसान होत असते. परंतु नुकत्याच झालेल्या सलग भूकंपांमुळे चीनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.