जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

जय भवानी, जय शिवाजी...या जयघोषणेने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरही दुमदुमला. 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

Updated: Jun 7, 2023, 01:37 PM IST
जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना title=
chhatrapati shivaji maharaj rajyabhishek celebrated in burj khalifa dubai

Shivrajyabhishek 2023 : किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. महाराष्ट्रासह जगातील कानाकोपऱ्यातही हा दिवस साजरा करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई इथेही अनोखा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दुबईतील मराठी बांधवांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला. (350th shivrajyabhishek din )

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त टूर्स व ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचं अनावरण करण्यात आलं. या नवीन संस्थाचे डॉक्युमेंट्स छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण नवीन कामाला सुरुवात करण्यात आली. 

परदेशात राहूनही शिवरायांची शिकवण, प्रेरणा आणि शिवभक्ती जपणारा असा अनोखा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्त्वात संदीप शिंपी, संदीप पवार, प्रशांत शिंपी आणि कुटुंब सहभागी झाले होते. या सोबतच दुबईत 18 जून 2023 ला छत्रपती मराठा साम्राज्य याच्या तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत करण्यात येणार आहे. दुबईतील सर्व शिवभक्त या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोफत सहभागी होणार होऊ शकणार आहेत. 

तिथीनुसार 2 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यानिमित्त 1 ते 6 जूनपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  6 जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. रायगडावर राज्यभरातून शिवभक्तांनी एकच गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी दोन महिन्यांपासून तयारी करण्यात आली होती.  

6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर (Raigad Fort) न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती.  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली असल्यामुळे, देशासह विदेशातही शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.