बगदाद : इराक (Iraq) मे लग्न सोहळ्यात (Wedding Party) जेवण बनवण्याची लगबग सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका बाजूला लग्न सोहळ्याचा आनंद होता, एकीकडे वऱ्हाडींचं जेवण बनवलं जातं होतं. याच दरम्यान जेवण बनवताना एका सेफचा मृत्यू झाला आहे.
गरमा गरम चिकन सूप बनवताना पाय घसरून शेफ कढईत पळला. यामध्ये शेफ जवळपास 70 टक्के भाजल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही. या घटनेनंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट यांच्या किचनमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
'द सन' च्या वृत्तानुसार, इराकमधील जखो जिल्ह्यातील हेजल हॉलमध्ये हा अपघात झाला. त्यावेळी 25 वर्षीय शेफ ईसा इस्माईल लग्नाच्या मेजवानीसाठी जेवण बनवत होते. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो सरळ उकळत्या सूपच्या मोठ्या भांड्यात पडला. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात त्याने 5 दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्याची प्राणज्योत माळवली. डॉक्टर 70 टक्के भाजलेल्या इस्माइला वाचवू शकले नाही.
इसा इस्माईल गेल्या अनेक वर्षांपासून शेफ म्हणून काम करत होती. मृताचा नातेवाईक झरवण होसनी यांनी सांगितले की, इस्माईल वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जेवण बनवत असे. सध्या तो दोन पार्टी हॉलमध्ये काम करत होता, त्यासाठी त्यांना दिवसाला 25,000 दिनार मिळायचे. होसनी यांनी सांगितले की इस्माईलला तीन मुले आहेत, ज्यांना या अपघातानंतर धक्का बसला आहे.
‘गल्फ न्यूज’ च्या वृत्तानुसार, या वेदनादायक दुर्घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. याबद्दल कुर्दिश आणि इराकी सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे. लोक म्हणतात की रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या पाहिजेत. काही वापरकर्त्यांनी सांगितले की बर्याच हॉटेल्समध्ये सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे असे अपघात होतात.