तुम्ही असं कधी करु नका, आधी लाखो रुपये जमविले नंतर मौजमजेसाठी खर्च केलेत, आता जेलची हवा

Fake Medical Report​ : ऐशआरामात जीवन जगण्यासाठी एका 28 वर्षीय महिलेने (Woman) असे काही केले की, तिला आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.  

Updated: Oct 15, 2021, 12:43 PM IST
तुम्ही असं कधी करु नका, आधी लाखो रुपये जमविले नंतर मौजमजेसाठी खर्च केलेत, आता जेलची हवा title=
फोटो: द सन

सिडनी : Fake Medical Report : ऐशआरामात जीवन जगण्यासाठी एका 28 वर्षीय महिलेने (Woman) असे काही केले की, तिला आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. ती सध्या जेलची हवा खात आहे. तिने कॅन्सर (Cancer) असल्याचे सांगून लाखो रुपये उभे केले आणि तिने ते पैसे आलिशान जीवन जगण्यासाठी उडवले. आता तिला तुरुंगात  दिवस घालवावे लागत आहेत.

28 वर्षीय महिलेने खोटेपणाचा कहर केला. तिने अशी कहाणी तयार केली की, ज्यांनी ती ऐकली ते प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले. महिलेने सांगितले की तिला कर्करोग आहे आणि ती तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जगणार नाही. उपचाराच्या नावाखाली तिने नातेवाईक-मित्रांकडून तसेच सामान्य लोकांकडून लाखो रुपये गोळा केले आणि त्यावर तिने भटकंती केली.

बनावट वैद्यकीय अहवाल तयार केला

'द सन' च्या अहवालानुसार, 28 वर्षीय हन्ना डिकिन्सन  (Hanna Dickinson) हिने तिच्या आईला सांगितले की, ती दुर्मिळ कर्करोगाने (Cancer) ग्रस्त आहे आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जगणार नाही. हन्नाने तिचे खोटे खरे करण्यासाठी खोटे वैद्यकीय अहवाल आणि बिले देखील तयार केली. यानंतर लोकांच्या भावनांशी खेळ करत त्यांच्याकडून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळले. ज्यांना हन्नाने कर्करोगाबद्दल सांगितले, ती दुःखी झालीत आणि त्यांनी शक्य तितके दान केले.

Hanna Dickinson ने इतके पैसे उभे केले

हन्ना डिकिन्सन हिने (Hanna Dickinson) मित्र आणि नातेवाईकांकडून 22 हजार पौंड (सुमारे 23 लाख रुपये) आणि उपचाराच्या नावाखाली इतर लोकांकडून 54 हजार पौंड (सुमारे 56 लाख रुपये) घेतले. हन्ना हिने लोकांना सांगितले की तिची केमोथेरपी सुरू होणार आहे आणि त्यासाठी मी परदेशात जाणार आहे. मात्र, तिने असे काही केले नाही. जमवलेवा सर्व पैसा तिने लक्झरी जीवन जगण्यावर खर्च केला. तथापि, नंतर तिचा हा खोटेपणा समोर आला आणि तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली.

दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा

ऑस्ट्रेलियन न्यायालयाने हन्ना डिकिन्सनला (Hanna Dickinson)  अडीच वर्षांची शिक्षा सुनावली, ती नंतर कमी करून एक वर्ष करण्यात आली. आता आणखी एका बनावट प्रकरणात मेलबर्न दंडाधिकारी न्यायालयाने तिला चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तिच्या व्यवस्थापकाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र केल्याप्रकरणी दोषी आढळली. एवढेच नव्हे तर एल लोन डिफॉल्ट प्रकरणी न्यायालयाने डिकिन्सनला आधीच दोषी ठरवले आहे.