G20 Summit in Bali: कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट

G20 परिषदेदरम्यान सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे 

Updated: Nov 15, 2022, 10:09 AM IST
G20 Summit in Bali: कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट title=
Cambodian Prime Minister Tests Corona Positive after hosting g20 summit in Bali Narendra Modi joe biden also meet

G20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ( 14 नोव्हेंबर) G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक नेत्यांसोबतच्या द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहण्यासाठी बाली येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे बाली येथे आगमन होताच त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दोन दिवसीय G20 शिखर परिषद आज (15 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते या परिषदेला उपस्थित असणार आहे. 

मात्र G20 परिषदेदरम्यान सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन (Cambodian PM Hun Sen) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंबोडियाच्या पंतप्रधानांनी काही दिवस आधीच Asean परिषदेत जागितक नेत्यांची भेट घेतली होती. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचाही समावेश होता. या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी G20 परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्या आहेत. 

याबाबत फेसबुक पोस्ट (facebook Post) करत कंबोडियाच्या पंतप्रधानांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोमवारी रात्री आपण चाचणी केली आणि मंगळवारी डॉक्टरांनी कोरोना झाल्याचा अहवाल दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण कंबोडियाला परत जात असून G20 परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान त्यांनी भेट घेतलेले जो बायडन परिषदेत सहभागी झालेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. तसेच आपण सोमवारी रात्री उशिरा बालीमध्ये दाखल झालो आणि सुदैवाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांसोबत डिनरसाठी जाऊ शकलो नाही असंही ते म्हणाले आहेत. आपल्याला करोनाची लागण नेमकी कधी झाली याबाबत काही माहिती नसल्याचं कंबोडियाच्या पंतप्रधानांनी यांनी म्हटले आहे. 

 वाचा : Twitter, Meta अन् Microsoft नंतर 'या' कंपनीमध्येही 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा!

मोदींनी या दोन देशांना सुनावले 

दरम्यान G20  परिषदेत पंतप्रधान मोदींनी अमेरिका (America) आणि युरोपीय (European) देशांना नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. उर्जा पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारची बंधन स्वीकारार्ह नाहीत असं मोदी यांनी ठामपणे सांगितलं. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर तेल, नैसर्गिक वायू, कोळसा आणि इतर उर्जा पुरवठ्यावर अमेरिका आणि इतर युरोपीय देश निर्बंध आणत आहे. त्यामुळे भारतासारख्या देशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी हे खडे बोल सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आज एकमेकांची परिषदेआधी गळाभेट घेतली. युक्रेन रशिया युद्ध, जागतिक मंदी या दोन मुद्द्यांवर या परिषदेत भर दिला जाणार आहे.