लॉकडाऊनमध्ये परदेशातही घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या

घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना 

Updated: May 7, 2020, 10:47 PM IST
लॉकडाऊनमध्ये परदेशातही घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या  title=

झुरीच : लॉकडाऊनच्या काळात युरोपमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. कोरोनाव्हायरसमुळे सर्वजण घरात लॉकडाउन आहेत. यादरम्यान मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे कुटुंबामध्ये गैरवर्तन वाढत आहे. यामुळे कुटुंबात जास्तीत जास्त असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून याचा दुरुपयोग होत असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ संस्थेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

लॉकडाऊनमुळे सार्वजनिक जीवनावर अनेक निर्बंध लादली आहेत. यामुळे प्रत्येकाच्या मनावर ताणतणाव निर्माण झाला आहे. एवढंच नव्हे तर चिंतेमुळे अनिश्चितता, विभक्त होणे आणि बऱ्याच लोकांच्या दैनंदिन जीवनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक युरोप हॅन्स क्लुगे यांनी दिली. 

कोविड-१९ मुळे जगभरात हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. बेल्जिअम, ब्लगोरिया, फ्रान्स, आयर्लंड, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यासारख्या अनेक देशांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्यांचारांबरोबर लहान मुलांवर देखील अत्याचार वाढत आहे. 

यामधून समोर आलेली माहिती ही धक्कादायक आहे. एप्रिल महिन्यात जवळपास ६०% महिलांनी आपत्कालीन क्रमांकावर फोन करून हिंसाचाराच्या तक्रारी केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल महिन्यात त्यांच्या जोडीदाराकडून अत्याचार झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

हिंसाचारापासून बचाव करणार्‍या हॉटलाईनची ऑनलाइन चौकशी पाच पटीने वाढली आहे, असे या एजन्सीने म्हटले आहे. काही देशांनी या समस्येचे निराकरण कसे करावे याची उदाहरणे दिली असल्याचे क्लुगे यांनी नमूद केले. इटलीकडे फोन कॉलशिवाय मदतीसाठी विचारण्यासाठी अ‍ॅप आहे, तर पीडित स्पेन आणि फ्रान्समधील फार्मासिस्टना कोड वर्डद्वारे सतर्क करू शकतात.