पेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता

ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्‍या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.

Updated: Nov 5, 2017, 10:51 AM IST
पेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता  title=

इजिप्त : ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्‍या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.

सुमारे  ५ तासांच्या चौकशीनंतर लौरा प्लुमर या ३३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.  लौरा तिच्या पतीसाठी ट्रामाडोल ( Tramadol) या पेनकिलरच्या गोळ्या घेऊन जात होती. 

एअरपोर्टवरचा लौराची तपासणी करून तिच्याकडून अरेबिक भाषेतील काही कागदांवर सही घेण्यात आली. त्यानंतर तिला १५ बाय १५ च्या कारागृहात अन्य २५ स्त्री कैदींसोबत जेरबंद करण्यात आले आहे. लौराच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, लौराला सुमारे 25 वर्षांची शिक्षा किंवा फाशी (डेथ पेनॅल्टी ) होऊ शकते. अशी माहिती इजिप्तच्या वकिलांनी दिली आहे. 

इजिप्तमधील कायद्यांनुसार लौराला ड्रग्ज्स ट्रॅफिकिंग करताना पकडले आहे. इजिप्त मध्ये ट्रामाडोल ( Tramadol)वर बंदी आहे. युकेमध्ये मात्र प्रिस्क्रिब्शनवर हे पेनकिलर मिळते. 
लौराकडे सुमारे २९ ट्रामाडोल ( Tramadol)च्या स्ट्रिप्स मिळाल्या. सोबतच काही नॅपरॉक्सिनच्यादेखिल naproxen गोळ्या होत्या.  

इजिप्तमधील ब्रिटीश कार्यालय लौराच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.