एका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक

सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

Updated: Apr 28, 2018, 04:50 PM IST
एका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक title=

लंडन : लॉटरी एक असे विश्व आहे. जे अनेकांपैकी काही लाकांनाच लाभते. अर्थात ज्याला लाभते तो नशिबवान म्हणायची आपलयाकडीची रीत. पण, सर्वांचेच नशीब इतके बलवत्तर असण्याची शक्यता अगदीच कमी. पण, या कमी शक्यतेतही अनेकजण अचूक बसतात. ज्यांचा हा अचूकतेचा बाण निशाण्यावर लागतो त्यांच्यावर होते 'छप्पर फाड के..' बरसात. असेच झालेय इग्लंडच्या एका व्यक्तिसोबत. या पठ्ठ्याला लॉटरी लागली तो चक्क १११० कोटी रूपयांचा मालक झाला. विशेष असे की, केवळ एकाच तिकीटावर त्याला इतकी गलेलठ्ठ रक्कम मिळाली आहे. लॉटरी विश्वातील हे एक ऐतिहासिक उदारहण मानले जात आहे.

लॉटरी विश्वातील विक्रम

सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मात्र, आतापर्यंत या लॉटरी विजेत्याची ओळख मात्र जाहीर केली गेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ही ओळक गोपनीय ठेवल्याचे समजते. दरम्यान, २०,२३, २८ आणि ३० असे विजेत्या लॉटरीचे अंक होते. तर, ०३ आणि ०७ हे लकी अंक होते. विशेष असे की, इग्लंडमधील सर्वात मोठी लॉटरी ही कोलिन आणि क्रिस यांनी जुलै २०११मध्ये जिकली होती. त्यावेळी त्यांनी सुमारे १५०३ कोटी रूपये जिंकले होते.

७ भारतीय मालामाल

दरम्यान, कोलिन आणि क्रिस या विजेत्या विवाहीत जोडप्याने लॉटरी जिंकल्याचा आनंद जल्लोषात साजरा केला. यानंतर २०१२ मध्ये एड्रियन आणि गिलियन बेफोर्ड यानी १३८१ कोटी रूपये लॉटरीच्या माध्यमातून जिंकले होते. महत्त्वाचे असे की लॉटरीसाठी केवळ इग्लंडच नव्हे तर, आबु धाबीही प्रसिद्ध आहे. प्राप्त माहिती अशी की, आबू धाबी मध्ये लॉटरी लागल्याने तब्बल ७ भारतीय मालामाल झाले आहेत.