Queen Elizabeth II Passed Away: सर्वात मोठी बातमी: ब्रिटनच्या राणी क्वीन एलिझाबेथ II यांचं निधन!

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II )  यांच्या तब्येतीबाबत सर्वात मोठी अपडेट 

Updated: Sep 8, 2022, 11:23 PM IST
Queen Elizabeth II Passed Away: सर्वात मोठी बातमी: ब्रिटनच्या राणी क्वीन एलिझाबेथ II यांचं निधन! title=

Britain Queen Elizabeth II health update: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II )  यांच्या तब्येतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर येतेय. इंग्लंडमधील बॅकिंघम पॅलेसमधून (Buckingham palace)  महाराणी एलिझाबेथ यांच्या तब्येतीबाबत बातमी समोर आली आहे. राणी एलिझाबेथ यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. एलिझाबेथ यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच  बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलेलं होतं. तब्येतीच्या कारणामुळे राणी एलिझाबेथ यांनी आपली प्रिव्ही काउन्सिलची बैठकही रद्द केली आहे.  

नुकत्याच इंग्लंडमध्ये  पंतप्रधानपदाच्या निवडणूक पार पडल्या (Election in England) आहेत. यावेळी स्वतः क्वीन एलिझाबेथ यांनी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या लीज ट्रस्ट (Liz Truss) यांची पंतप्रधान म्हणून औपचारिक घोषणा केली होती. स्वतः नवनियुक्त पंतप्रधान यांनी राणी एलिझाबेथ यांच्या यांची विचारपूस करण्यासाठी स्कॉटलंडमधील बाल्मोर कॅसलमध्ये पोहोचल्या होत्या. 

कुटुंबाकडून आली चिंताजनक माहिती (Royal Family On Queen Elizabeth II ) 

रॉयल फॅमिलीकडून आलेल्या अधिकृत ट्विटमध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. राणी एलिझाबेथ या स्कॉटलंडमधील बाल्मोर कॅसलमध्ये होत्या. त्यांना यांना भेटण्यासाठी प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स चार्ल्स हे दाखल झाले होते. संपूर्ण यावेळी देशभरातून राणी एलिझाबेथ यांच्या आरोग्यसाठी प्रार्थना देखील करण्यात येत होत्या.

बॅकिंघम पॅलेसने केलेल्या अधिकृत ट्विटमध्ये डॉक्टरांची टीम राणी एलिझाबेथ यांच्या निधनाची बातमी दिली आहे. 

मंत्र्यांसोबतची बैठकही रद्द 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीत, राणी एलिझाबेथ यांना आरामाचा सल्ला देण्यात आलेला. यादरम्यान एलिझाबेथ यांच्या इंग्लंडमधील बड्या नेत्यांसोबतच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. स्वतः इंग्लंडच्या नवनियुक्त पंतप्रधान लीज ट्रस यांनी राणी एलिझाबेथ यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. 

PM नरेंद्र मोदींकडूनही शोक व्यक्त: 

 

Britain Queen Elizabeth II passed away at the age of 96 royal family tweets