बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच..

Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2023, 10:07 AM IST
बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच.. title=

Crime News: आजकालच्या नात्यात प्रेमापेक्षा पझेसिव्हनेस, संताप जास्त पाहायला मिळतो. त्यामुळे रागाच्या भरात आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत काय करतोय, याची कल्पनादेखील अनेकांना नसते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छोट्या कारणावरुन बॉयफ्रेंडच्या डोळ्यात रेबीजची सुई खुपसण्याचा प्रकार गर्लफ्रेंडने केला. या घटनेंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. काय आणि कसा घडलाय हा प्रकार, सविस्तर जाणून घेऊया. 

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय. गेल्या आठ वर्षांपासून हे कपल एकत्र राहत होते. काहीतरी निमित्त ठरलं आणि रागाच्या भरात प्रेयसीने प्रियकराच्या डोळ्यात रेबीजची सुई टोचली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हे जोडपे गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र गेल्या शनिवारी रात्री दोघांमधील भांडण खूप टोकाला गेले. यानंतर संतापलेल्या महिलेने रागाच्या भरात नको तेच केले. 

nypost ने याबद्दल माहिती दिली आहे. मियामी-डेड काउंटीमधील एका घरात ही घटना घडली. आपला बॉयफ्रेंड इतर मुलींकडेही बघत असतो याचा राग गर्लफ्रेंडच्या मनात अनेक दिवसांपासून होता. शनिवारी रात्री 10 वाजता जोडपे आपल्या. घरी पोहोचले. प्रियकर सोफ्यावर झोपला होता आणि दोघांमध्ये वाद सुरु होते. तितक्यात गर्लफ्रेंडने हातात रेबीजची सुई घेऊन बॉयफ्रेंडच्या अंगावर उडी मारली आणि त्याच्या उजव्या डोळ्यात सुई खुपसली.

भयानक बदला

डोळ्यात सुई घुसल्यानंतर बॉयफ्रेंड वेदनेने विव्हळत होता. थोड्या वेळात त्याने 911 वर फोन करुन पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून त्याला जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी 44 वर्षीय आरोपी गर्लफ्रेंड सँड्रा जिमेनेझला अटक केली. 

या संपूर्ण घटनेवर बॉयफ्रेंडने प्रतिक्रिया दिली आहे. आपण हे इंजेक्शन आपल्या कुत्र्यांसाठी आणले होते. पण आपल्या गर्लफ्रेंडच्या मनात काय चालले आहे? याची आपल्याला कल्पना नव्हती, असे त्याने सांगितले.