खुश होऊन बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं असं सरप्राईज, ज्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही

या व्हिडीओमध्ये साराने कर्मचाऱ्यांसमोर सरप्राईज जाहीर केलं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता

Updated: Jul 29, 2022, 05:12 PM IST
खुश होऊन बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं असं सरप्राईज, ज्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही title=

मुंबई : आपल्या मनात एखाद्या बॉसबद्दल एक इमेज तयार झाली आहे की, बॉस हा खडूस किंवा रागीट व्यक्ती असतो. त्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडून फक्त काम करुन हवं असतं. बाकी त्याला आपल्या कर्मचाऱ्यांची काहीही चिंता नसते. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, सगळेच बॉस असे नसतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना एक असं सरप्राईज देतो, जे पाहून सगळेच लोक आनंदी होतात.

या प्रकरणात, अंडरवेअर फर्मची बॉस, स्पॅनक्स सारा ब्लेकली Spanx Sara Blakely ही आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रकारे समजते आणि त्यांच्यासाठी ती सर्वतोपरी विचार करते.

द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, येथील बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना जगात कुठेही जाण्यासाठी 7 लाख 97 हजार 855 रुपये बोनस आणि दोन फर्स्ट क्लास तिकिटे दिली. तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे आणि यासंदर्भात एक व्हिडीओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओमध्ये साराने कर्मचाऱ्यांसमोर हे सरप्राईज जाहीर केलं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. सारा तिच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हणाली की, तुम्हा सर्वांसाठी हा मोठा क्षण आहे.  हे जाहीर करताना सारा आनंद होती, तिने सर्वांना तिकीट देत सांगितले की, तुम्ही जोडीदारासोबत कुठेही फिरायला जा आणि या पैशांचा तिथे खाण्यासाठी, फिरण्यासाठी आणि हॉटेलसाठी वापर करा.

साराने हा क्षण जगभरातील सर्व महिलांना समर्पित केला. यामध्ये साराला तिची आई आणि आजीचीही आठवण आली. सारा नेहमीच महिला सशक्तीकरणाबद्दल आश्चर्यकारक कोट्स आणि संदेश शेअर करत असते.