सह कर्मचाऱ्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होते बिल गेट्स, महिलांना देत असे ऑफर

धक्कादायक खुलासा.... बिल गेट्स यांच्या प्रकरणाची माहिती 

Updated: May 17, 2021, 01:12 PM IST
सह कर्मचाऱ्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होते बिल गेट्स, महिलांना देत असे ऑफर title=

मुंबई : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बिल गेट्स यांनी नुकताच आपली पत्नी मेलिंडा गेट्स यांना घटस्फोट दिला आहे. मात्र यानंतर त्यांच खासगी आयुष्य खूप चर्चेत राहिलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बिल गेट्सने विवाहित असूनही काही महिला कर्मचाऱ्यांना डेटवर येण्याची विचारणा केली. एवढंच नव्हे तर एका कर्मचारी महिलेसोबत गेट्स रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होते. 

रिपोर्टनुसार 2000 साली बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या इंजीनियर कर्मचारी महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. यबाबतचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा 2019 साली महिलेने कंपनीच्या बोर्डला पत्र लिहून या अफेअरबाबतची सगळी माहिती दिली होती. बिल आणि मेलिंडाने 1994 साली लग्न केलं होतं. 

यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कंपनीने एक बोर्ड कमिटी निर्माण केली. या चौकशी दरम्यान मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचारीला पूर्ण पाठिंबा देण्यात आला. मात्र या प्रकरणाची चौकशी होत असतानाच बिल गेट्स यांनी कंपनीतून राजीनामा दिला. डब्ल्यूएसजेशी बोलताना कंपनीतील एका प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा आणि या प्रकरणाचा काहीच संबंध नाही. 

2020 साली बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट बोर्डमधून राजीनामा दिला. याच दिवशी बर्कशायर हॅथवेच्या बोर्डातूनही राजीनामा दिला. बिल गेट्सचे मित्र आणि सर्वात लोकप्रिय इंवेस्टर वॉरेन बफेट ही कंपनी चालवत असे. बिल गेट्स यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्य नडेला यांचे टेक ऍडवायझर म्हणून राहिले. 

या रिपोर्टनुसार, बिल गेट्स विवाहित असूनही अनेक महिलांना डेट करत असतं. यामध्ये मायक्रोसॉफ्ट बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, त्यांनी कधीच कुणा महिलेवर दबाव टाकला नाही. 

2006 मध्ये बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट कंपनीने एका कर्मचारी महिलेला प्रेझेंटेशन पाहिल्यावर निर्णय घेतला. बिल यांनी यानंतर महिलेला ईमेल केला होता. याबाबत तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही मेल केला. त्या महिलेने देखील याबाबत पुढाकार घेतला आणि प्रोफेशनल संबंध ठेवले.