OMG! पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंमध्ये, जाणून घ्या का आहे इतकी महाग

पाण्याच्या बाटलीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?

Updated: Jun 15, 2022, 05:34 PM IST
OMG! पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंमध्ये, जाणून घ्या का आहे इतकी महाग  title=

मुंबई: तुम्ही आतापर्यंत खूप महागड्या गोष्टींबद्दल ऐकलं असेल. जगात बहुतेक लोक हिरे-मोती, सोने-चांदीला सर्वात महाग वस्तू मानतात, परंतु तसं नाही. काही गोष्टी अशा आहेत की, ज्यांची किंमत सोने-चांदी आणि हिरे-मोत्यांहूनही खूप महाग असते. या वस्तूंची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाण्याच्या बाटलीसाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतात, असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, पण हे खरं आहे.

या पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंच्या घरात 

तुम्ही आजवर 15 ते 20 रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च केले असतील. विमानतळावर पाण्याच्या बाटलीसाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च केले असतील. पण आपण ज्या पाण्याच्या बाटलीबद्दल बोलत आहोत त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. या पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे, कारण या पाण्याच्या बाटलीची किंमत 65 लाख रुपये आहे.

इतकी किंमत का आहे?

आम्ही तुम्हाला सांगतो की बेवर्ली हिल 90H20 च्या पाण्याच्या बाटलीची किंमत 65 लाख रुपये आहे. म्हणजेच या पाण्याच्या एका थेंबाची किंमत हजारो रुपये आहे. सामान्य माणसाने ती विकत घेण्याचा विचार जरी केला तरी त्याला संपूर्ण मालमत्ता विकावी लागू शकते. पण त्याची किंमत इतकी जास्त का आहे? वास्तविक बेवर्ली नावाच्या कंपनीने ही पाण्याची बाटली बाजारात आणली आहे. या बाटलीचं झाकण 14 कॅरेट व्हाईट गोल्डपासून बनवलं आहे. याशिवाय त्याच्या झाकणावर 250 हिरे जडले आहेत. त्यामुळे त्याची किंमत इतकी आहे.