इंग्लंड : लंडनमध्ये अटकेत असलेल्या हिरे व्यापारी निरव मोदीला जामीन पुन्हा नाकारण्यात आला आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पळपुटा हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाचे फेटाळून लावला. भारताच्या प्रयत्नांना मिळालेलं हे मोठं यश आहे. भारताची बाजू मांडणाऱ्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस म्हणजेच सीपीएसच्यावतीने नीरव मोदीला जामीन मंजूर करण्याचे धोके न्यायालयात मांडण्यात आले. यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेतील पुरावे नीरव मोदीनं नष्ट केल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला.
Next date of hearing is 26 April. https://t.co/cITzGEcrx5
— ANI (@ANI) March 29, 2019
निरव मोदीने एक साक्षीदार आशिष लाड याला बोलावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच तो भारतीय तपास तथकांना सहकार्य करीत नाही. त्याला जामीन द्यावा असे कोणतेही पुरेसे कारण उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. तसेच जर त्याला जामीन मंजूर झाला तर तो कदाचित सर्वप्रथम देश सोडू शकतो त्याचबरोबर तरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुरावेही नष्ट करून साक्षीदारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न करु शकतो. निरव मोदी पुन्हा एकदा फरार होऊ शकतो, असंही भारताच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. घोटाळ्यातील साक्षीदारांना लाच देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न नीरव मोदीनं केल्याची बाबदेखील न्यायालयापुढं मांडण्यात आली. या सर्व मुद्द्यांचा विचार करून न्यायालयानं नीरव मोदीला जामीन देण्यास नकार दिला.
London's Westminster Magistrate court rejects bail application of Nirav Modi. pic.twitter.com/JmDk0GNEnm
— ANI (@ANI) March 29, 2019