Baba Vanga यांचं भाकित, कोरोनानंतर या वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी !

यंदाच्या वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी !  बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी?  

Updated: Jul 20, 2022, 03:22 PM IST
Baba Vanga यांचं भाकित, कोरोनानंतर या वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी ! title=

मुंबई : बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक गोष्टींवर भविष्यवाणी केली. महत्त्वाचं म्हणजे दृष्टी नसतानाही आतापर्यत अनेक भाकीते खरी ठरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भविष्यवाण्या या मनुष्य आणि धरतीचा र्हास करणाऱ्या असल्याने मानव जातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. बाबा वेंगा यांनी 2022 सालासाठी भयानक भविष्यवाणी केली होती. त्याचे अनेक भाकीते खरे ठरले आहेत, त्यामुळे आता लोकांना भीती वाटू लागली आहे की त्याचे इतर भाकीते  खरे ठरले तर काय होईल?

बाबा वेंगा यांना 2022 साठी केलेली भविष्यवाणी
बाबा वेंगा म्हणाले होते की 2022 मध्ये लोक पूर्वीपेक्षा जास्त वेळ मोबाईल स्क्रीनवर व्यतीत करतील. आजकाल जगभरात ज्या प्रकारे मोबाईल फोनचा वापर वाढला आहे, त्यावरून हे भाकित खरे ठरताना दिसत आहे. 

यासोबतच त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती की, माहामारीमुळे साथीचा रोग होईल. हा विषाणू सायबेरियात सापडेल आणि हवामान बदलामुळे त्याचा जन्म होईल, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं. याचा अर्थ कोविड-19 विषाणूमुळे आणखी एक साथीचा आजार उद्भवू शकतो.

'ही' भाकित ठरली खरी 
बाबा वेंगा म्हणाले होते की 2022 मध्ये अनेक आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये भीषण पूर येईल. सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियात मुसळधार पावसामुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बाबा वेंगा यांनीही अनेक शहरांमध्ये दुष्काळाची शक्यता वर्तवली होती. सध्या युरोपातील अनेक भागात भीषण दुष्काळ आहे. इटली 1950 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळातून जात आहे. या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.