संसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!

ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं... 

Updated: Jun 22, 2017, 10:27 PM IST
संसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान! title=

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं... 

एकीकडे वॉटर्स ब्लॅक लंग्ज रोगाबद्दल विधेयक मांडत होत्या. त्याच वेळी त्यांची चिमुरडी आलिया जॉय आपली भूक भागवत होती... पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटमध्ये बाळांना स्तनपान करायचं असेल, तर चेंबरमध्ये बसणं बंधनकारक होतं. मात्र गेल्यावर्षी ही बंदी उठली. 

त्यानंतर गेल्या महिन्यात वॉटर्स यांनी पहिल्यांना संसदभवनात आपल्या मुलीला स्तनपान करवलं होतं. त्यानंतर आज विधेयक मांडताना स्तनपानाची बातमीही ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये गाजतेय.