बांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन

बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल. 

Updated: Nov 13, 2017, 02:49 PM IST
बांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन title=

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल. 

एका समुदायाच्या युवकाने आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याची अफवा पसरल्याने या हिंदूंची घरे जाळण्यात आली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी सांगितले की, बांगलादेशी अधिकाऱ्यांनी हिंदूंना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.

बांग्लादेशातील एका समुदायाच्या लोकांनी हिंदूंची किमान 30 घरे जाळली. अफवा अशी होती की अल्पसंख्य समुदायाच्या एका युवकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, हा मुद्दा बांगलादेशी सरकारच्या समोर ढाकामध्ये उच्चायुक्तांपुढे उपस्थित केला जाईल.

त्यांनी ट्विट केले की, "ढाकामध्ये आम्हाला भारतीय उच्चायुकाकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाला आहे. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की पीडितांना नुकसान भरपाई दिली जाईल जेणेकरून ते आपल्या घरांची पुनर्बांधणी करू शकतील आणि त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवले जाईल.

ढाका येथून सुमारे 300 किलोमीटर दूर, रंगपूर जिल्ह्यातील ठाकुरपाडा गावात जाळपोळ झाल्याची ही घटना घडली आहे.