नवी दिल्ली : लेबनॉन आणि सौदी अरब यांच्यात तणाव वाढत आहे चालला आहे. हा वाद सुरु असतानाच सौदी अरबमधून पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे लेबनॉनचे माजी पंतप्रधान साद उल हरीरी यांनी स्वदेशात परत येण्याचे आव्हान केले आहे.
हरीरी यांचं हे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष मिशेल औउन यांच्या वक्तव्याच्या काही तासानंतर लगेच आलं आहे. ज्यामध्ये हरीरी यांना रियादमध्ये नजहकैदेत ठेवल्याचं बोललं गेलं होतं.
लेबनॉनचे माजी पंतप्रधान हरीरी सौदी अरेबची राजधानी येथून गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर ते स्वदेशात आले नव्हते. लेबनॉनने हारीरीचे अपहरण केल्याचा आरोप सौदी अरबवर केला आहे. सौदी अरबचं म्हणणं आहे की, हरारी यांनी सहकारी लेबनानी संघटनेकडून जीवाचा धोका असल्याने राजीनामा दिला आहे. अमेरिका आणि फ्रान्सने लेबनॉनच्या सार्वभौमत्व आणि स्थिरतेला पाठिंबा दर्शविला आहे.
लेबनीज अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष मिशेल औऊन यांनी आपल्या राजदूतांना हरीरी यांच्या अपहरणाची माहिती दिली होती. औऊन यांनी सऊदी अरबला प्रश्न केला आहे की, राजीनामाची घोषणा केल्यापासून आतापर्यंत हरीरी परत का आले नाहीत. मिशेल यांनी अद्याप हरीरीचा राजीनामा स्वीकारला नसल्याचं देखील म्हटलं जातंय.
हरीरींचा पक्ष फ्यूचर मूव्हमेंट यांनी असेही म्हटले आहे की, ते त्यांच्यासोबत आहे. हरीरी यांना कुटुंबियातील लोकांनी संपर्क केला असता ते सुखरुप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण स्वदेशात कधी येणार हे देव जाणो असं देखील त्य़ांनी म्हटलं आहे.