नव्या जमान्याचा नॉस्टरडेमस, केली ही गंभीर भविष्यवाणी, याआधी केलेल्या भविष्यवाण्या उतरल्यात सत्यात

ब्राझीलच्या या भविष्यवेत्त्याचे नाव एथोस असं आहे...

Updated: Oct 18, 2022, 08:59 PM IST
नव्या जमान्याचा नॉस्टरडेमस, केली ही गंभीर भविष्यवाणी, याआधी केलेल्या भविष्यवाण्या उतरल्यात सत्यात title=

Living nostradamus : जगभरात अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्टरडेमस यांच्या भविष्यवाण्यांबाबत अनेकांना प्रचंड आकर्षण असतं. भविष्यात काय होऊ शकेल याबाबात त्यांनी हजारो वर्षांआधी भाकितं केली आहेत. यामध्ये हिटलरचं भाकीत, हिरोशिमा नागासाकीबाबत भाकीत, न्युक्लिअर हल्ला किंवा महायुद्धाबाबत अनेक भाकितं करण्यात आली होती. मुळात आधीच भविष्य जाणून घेण्याच्या मानवी वृत्तीमुळे अशाप्रकारची माहिती वाचायला अनेकांना आवडतं.  हे भविष्यवेत्ते हे अनेक वर्षांपूर्वी होऊन गेलेत. मात्र आता यांच्याच पंक्तीत एका ब्राझीलच्या माणसाला बसवण्यात आलं आहे. या माणसाचं नाव आहे एथोस (athos salome). हा माणूस ब्राझीलमधील असल्याचं समजतं. यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या झाल्याचं बोललं जातंय. 

ब्राझीलच्या या भविष्यवेत्त्याचे नाव एथोस असं आहे. या माणसाने जगभरातील कोरोनाची महामारी ( Corona Pandamic) , एलॉन मस्क आणि ट्विटर डील ( Elon Musk and Twitter Deal) , क्वीन एलिझाबेथ द्वितीय ( Quen Elizabeth 2nd)  यांच्याबाबत भविष्यवाणी केलेली. यासोबतच याने एलॉन मस्कच्या नव्या ह्युमनॉइड रोबोबाबत देखील भविष्यवाणी केली आहे. एथोस यांनी केवळ एवढ्यावरच न थांबता थेट तिसऱ्या महायुद्धाबाबतची भविष्यवाणी देखील केली आहे. 

नव्या जमान्याचा नॉस्टरडेमस म्हणतो तरी काय? 

भविष्यवेत्ता एथोस यांनी मोठा दावा केला आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्याचं ते म्हणतात. अनेकजणांना हा इसम केवळ तुक्केबाज वाटतो. दरम्यान लोकांच्या टीकेवर स्वतः  एथोस यांनीही भाष्य केलं आहे. मी स्वतःला भविष्यवेत्ता मानत नाही आणि लोकांच्या टीकेला देखील मानत नसल्याचं ते सांगतात.     

एथोसच्या मते त्यांच्यातील कौशल्याला विज्ञानाची जोड आहे.  त्यांच्या मते त्यांच्या भविष्यवाण्यांबाबत टेक्निकल ऍनालिसीसी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये कोणतीही ट्रिक आढळून आलेली नाही. 

वयाच्या बाराव्या वर्षांपासून एथोस यांना आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचं भासायचं. ज्या घटनांवर आपलं नियंत्रण नाही अशा घटनांबाबत चर्चा करण्यात त्यांना रुची होती. ते जे बोलतात त्यावर त्यांचा स्वतःचा देखील देखील विश्वास बसत नाही. अनेकदा मी असं काहीतरी बोलतो ते त्यावेळी अशक्य वाटतं, मात्र नंतर ते सत्यात उतरतं, असं ते म्हणतात. स्वतःमधील क्षमता हा म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचं देखील एथोस म्हणतात. जगातील प्रत्येक माणूस हा ईश्वराच्या अंशापासून तयार झाला आहे आणि म्हणून तोही अर्धा देव असल्याचंही एथोस म्हणतात. 

athos salome new age nostradamus predicts about third world war