Mahmoud Abbas Video : इस्रायल-हमास युद्धादरम्यान (Israel-Hamas war) मंगळवारी वेस्ट बँक परिसरात पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास (Mahmoud Abbas) यांच्या ताफ्यावर हत्येचा प्रयत्न करण्यात आला. 'सन ऑफ अबू जंदाल' नावाच्या कट्टरपंथी दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात महमूद अब्बास यांच्या बॉडीगार्डचा मृत्यू झालाय. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
'सन ऑफ अबू जंदाल'ने अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील अशी धमकीही या दहशतवादी संघटनेने अब्बास यांना दिली होती. महमूद अब्बास यांच्या ताफ्याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा (Assassination attempt on Palestinian President) प्रयत्न केला गेला. दहशतवादी संघटनेच्या हल्लेखोरांनी मारण्याचा पूर्ण कट रचला होता. राष्ट्रपतींच्या घराबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी वाहनाभोवती काही बंदूकधारी उपस्थित होते. राष्ट्रपती आल्यावर सुरक्षारक्षक सतर्क झाले. मात्र, हल्ला झाला अन् एका बॉडीगार्डला गोळी लागली. मात्र, इतर सुरक्षा रक्षकांनी राष्ट्रपतींचे प्राण वाचवले.
BREAKING:
Assassination attempt on Palestinian President Mahmoud Abbas! One of his bodyguards was killed. Hamas is trying to create chaos#Gaza #CeasefireForGazaNOW#GazaGenocide by #HamasTerrorists #FreePalestineNow #GazaHolocaust #FreePalestineNow#AUSvsAFG #IsraelAttack… pic.twitter.com/a6TnqFR32i
— ANDREW FORSBERG (@akillis21) November 7, 2023
हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यादरम्यान ओलीस ठेवलेल्या 240 हून अधिक लोकांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी हल्ले 'काही काळासाठी' थांबवण्यास तयार असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं होतं. अमेरिकेने वारंवार इस्रायलच्या भक्कम पाठिंबा व्यक्त केला आहे. मात्र, आता गाझा शहर ताब्यात घेण्याच्या मुद्यावरून अमेरिकेने इस्त्रायलला फटकारले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धावरुन असणारे मतभेद प्रथमच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गाजा पट्टीत सुरु असलेलं हे युद्ध इतक्यात थांबण्याची शक्यता नाहीय. युद्ध विराम जाहीर करण्यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढत चालला आहे. पण हमासला समूळ नष्ट करेपर्यंत थांबणार नाही, अशी प्रतिज्ञाच इस्रायलने केली आहे. त्यामुळे नजीक भविष्यात तरी यावर कुठलाही तोडगा दृष्टीपथात नाही. त्यामुळे रक्तसंहार थांबणार तरी कधी? असा सवाल विचारला जात आहे.