एलओसीवर पाकिस्तानचा एफएमद्वारे दहशतवाद्यांना संदेश ?

एलओसीच्या जवळील गावांना घाबरविण्यासाठी एफएम रेडीओ स्टेशनची मदत

Updated: Aug 28, 2019, 04:13 PM IST
एलओसीवर पाकिस्तानचा एफएमद्वारे दहशतवाद्यांना संदेश ? title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. वारंवार अपयशी होऊनही भारताला त्रास देण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही आहे. एकीकडे पाकिस्तानी सैन्य जैशच्या दहशतवाद्यांमार्फत घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. तर एलओसीच्या जवळील गावांना घाबरविण्यासाठी एफएम रेडीओ स्टेशनची मदत घेतली जात आहे. 

सिग्नल कोर रेडीओ फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून दहशतवाद्यांना संदेश पोहोचविला जात आहे. पाकिस्तानी सेना एफएम रेडीओ स्टेशनला नियंत्रण रेषेजवळ आणत आहे. पाकिस्तानच्या १० कोअर कमांडरांनी सिग्नल कोअर कमांडर्सना हे काम दिले आहे. तसेच एलओसीजवळ नवे एफएम स्टेशन लावण्याचे आदेश पाकिस्तान आर्मीने दिले आहेत.  

पाकिस्तानतर्फे दहशतवादी कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यापासून एलओसीवर मोठ्या संख्येने सैनिक आणि तोफा उभ्या केल्या जात आहेत.  हे सर्व करून पाकिस्तानला युद्ध करायचे आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हालचाली वाढल्या 

*पाकिस्तान सैन्यदलाकडून LoCवर मीडियम रेंज तोफा तैनात 

*LoCनजीक पाकिस्तान सैन्यदल आणि BATच्या हालचालीही वाढल्या आहेत. 

*पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून LoCवर SSGचे १०० जवान तैनात 

*बांग्लादेशमधील हरिनमारा डोंगररांगांमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली 

*दहशतवादी तळांमध्ये रोहिंग्यांना प्रशिक्षण

हवाई तळ बंद ?

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन हवाई तळ पाकिस्तानकडून ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आले. पाकिस्तान सिव्हिल एविएशन अथॉरिटी (सीसीए)ने नोटीस जारी करत याविषयीची घोषणा केली. ज्यामध्ये पर्यायी मार्गांची माहितीही देण्यात आली आहे. या निर्णयाचा भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही, असं सीसीएकडून सांगण्यात आलं आहे.