स्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?

स्मशानभूमीत सापडलेलं  2600 वर्षांपूर्वीचं पनीर पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाहून शास्त्रज्ञांनाही मोठा धक्का   

Updated: Sep 28, 2022, 09:11 AM IST
स्मशानभूमीत सापडलेलं  2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?  title=

Archaeological Discoveries : प्राचीन वस्तू अचानक सापडल्यानंतर आश्चर्य वाटेल. आता तर एका स्मशानभूमीत 2600 वर्षांपूर्वीचं पनीर सापडलं आहे. पुरातत्त्वीय (archaeological finds) शोध लावणारे शास्त्रज्ञ इतिहासाची मुळं खोदण्यात कायम व्यस्त असतात. यावेळी इजिप्तमध्ये शोध सुरू असताना अशी एक गोष्ट सापडली आहे, जी पाहून सगळेच थक्क झाले आहेत. इजिप्तमध्ये स्मशानभूमीत शतकानुशतके जुन्या पनीरचे तुकडे सापडले आहेत. 

पनीरचे (cheese) हे तुकडे 2600 वर्षे जुने असल्याचं सांगण्यात येत आहे. एका भांड्यात पनीर सापडलं आहे. एकीकडे घरात ठेवलेलं पनीर दोन-तीन दिवसांत खराब होतं, तर दुसरीकडे 2600 वर्षे जुनं पनीर मिळणं हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. ( archaeological)

माती भांड्यांत सापडलं पनीर (Cheese found in a clay pot)
इजिप्तमध्ये सापडलेलं जुनं पनीर मातीच्या भांड्यात सापडलं आहे, ज्यावर प्राचीन भाषेत लेखही लिहिलेले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या पनीरमध्ये शेळी आणि मेंढीच्या दुधाचे अंश आहेत.

पनीरला इजिप्तमध्ये हॉलौमी (halloumi) म्हणतात. शेळी आणि मेंढीच्या दुधापासून बनवलेले पनीर चवीला हलके चटपटीत असतं. चीजबद्दल पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की हे चीज इजिप्तच्या 26व्या किंवा 27व्या साम्राज्याच्या काळातील आहे. (archaeological mysteries)

3200 वर्षे जुनं पनीरही सापडलं
यापूर्वी पाथम्स स्मशानभूमीत 3200 वर्षे जुने पनीर सापडलं आहे. हे आतापर्यंतचे सर्वात जुनं पनीर मानले जातं. पाथम्स स्मशानभूमीत जुनं पनीर सापडल्यानंतर इजिप्तमध्ये सापडलेलं पनीर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी जमली. हे पनीर पाहून शास्त्रज्ञांनाही मोठा धक्का बसला आहे.