धक्कादायक ! ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरचा आणखी एक प्रकार सापडल्याने खळबळ

जगभरातील लोकांच्या चिंता वाढल्या.

Updated: Dec 23, 2020, 10:13 PM IST
धक्कादायक ! ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरचा आणखी एक प्रकार सापडल्याने खळबळ title=

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या प्रकाराची दहशत असताना आता आणखी एक तिसरा प्रकार सापडल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डझनहून अधिक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या हवाई सेवा स्थगित केल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनहून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. काल रात्री 10 ते आज सकाळी 10 पर्यंत ब्रिटनहून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांपैकी कुणालाही कोरोना झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण 2000 प्रवासी आज येणं अपेक्षित होतं. त्यापैकी प्रत्यक्षात आलेल्या 1688 प्रवाशांपैकी 745 प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर मुंबईतून इतर राज्यात गेलेल्या प्रवाशांची संख्या 602 आहे. पण एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणं नाहीत ही मुंबई आणि राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे भारतातही भीती पसरलीय. आता या विषाणूवर पुण्यात संशोधन सुरू करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या नवीन विषाणूला घाबरण्याची गरज नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीत नव्या विषाणूबाबत योग्य ते संशोधन करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलीय. लस तयार करतोय ती त्यावर परिणाम करू शकते असंही ते म्हणाले. लसीकरणाबाबत भारत बायोटेक आणि सिरमनं  केंद्राकडे परवाना मागितलाय. या कंपन्यांना कधी परवाना द्यायचा आणि कोणत्या कंपनीला कोणती राज्य द्यायची हे केंद्र ठरवणार अशी माहिती त्यांनी दिली.