मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास

२६/११ या मुंबई (Mumbai terror attack) हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Updated: Nov 19, 2020, 07:11 PM IST
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास  title=

इस्लामाबाद : २६/११ या मुंबईत (Mumbai terror attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने हाफिज सईद याला बेकायदेशीर मार्गाने पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९ मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

२०२० मधील सईद याचा हा चौथा गुन्हा आहे. लाहोरमधील दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात हाफिज सध्या पाच वर्षांची शिक्षा भोगत आहे. तसेच अन्य तीन Jamaat-ud-Dawah दहशतवाद्यांना न्यायालयाने साडे दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल रहमान मक्की यांना सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी कोर्टाने ही शिक्षा ठोठावली असून हाफिज सईदची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या दहशतवादी सईद याला दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठा प्रकरणात १७ जुलै २०१९  रोजी अटक करण्यात आली होती आणि आतापर्यंत त्याच्यावर चार खटल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. जमात-उद-दावाच्या नेत्यांविरूद्ध एकूण ४१ खटले दाखल करण्यात आले आहेत. काही खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

हाफिजविरोधात आतापर्यंत चार प्रकरणातील आरोप निश्चित झाले आहेत. व्यावसायिक कर विभागाने जमात उद दावाच्या नेत्यांविरोधात एकूण ४१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २४ प्रकरणाचा निकाल लागला आहेत. तर इतर गुन्हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. ऑगस्टमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने  हाफिज सईद याच्या वर्तुळातील जमातच्या तीन नेत्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपूरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.