Women Have Two Vegina Viral News: अमेरिकेत राहणाऱ्या 37 वर्षीय लीन बेलचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लीन लाखो रुपयांची कमाई करते. सध्या तिच्याकडे पैशांची कोणतीही अडचण नाही. पण इतकं असूनही तिला पार्टनर मिळण्यास अडचणी येत आहेत. लीन बेल अजूनही अविवाहित आहे. कारण मुलांना तिचं गुपित कळलं ते तिला थेट नकार देत आहे. वास्तविक, लीन बेलला गर्भाशयाच्या डिडेल्फिसची समस्या आहे. ही स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. यात स्त्रीमध्ये दोन योनी, दोन गर्भाशय आणि दोन गर्भाशयाचा विकास होतो.
लीन बेल या अनोख्या स्थितीचा पुरेपूर फायदा घेते आणि ओन्लीफॅनवर दर महिन्याला लाखो रुपये कमवते. ती स्वतः म्हणते की, "डबल योनीमुळे मी चांगली रक्कम कमावते." पण लीन बेलला वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास होत आहे. लीन बेलने सांगितलं की, "कोणताही मुलगा तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित नाही." कारण तिच्यासोबत सेक्स त्यांच्यासाठी वेदनादायक ठरू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला तिने ऑनलाइन डेटिंगचा प्रयत्न केला पण तिच्या डबल योनीमुळे अनेक जणांनी पाठ फिरवली."
लीनला सोशल मीडियावर एका चाहत्याने तुमच्यासाठी सेक्स कसा आहे असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने उत्तर दिले की, "माझा पहिला बॉयफ्रेंड माझ्यासोबत सेक्स करत होता, तेव्हा त्याला अचानक त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खूप वेदना जाणवू लागल्या. याचे कारण म्हणजे माझ्या दोन्ही योनींना वेगळे करणारा सेप्टम, ज्यामुळे त्याला त्रास होत होता. हे त्याच्यासाठी खूप वेदनादायक होते. त्यानंतर त्याने ब्रेकअप केलं. लीन बेलने सांगितलं की, "मला वयाच्या 28 व्या वर्षी कळले की ही दुर्मिळ स्थिती आहे. तिला सहसा दर महिन्याला दोन मासिक पाळी येते."