वैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प

वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ... 

Updated: Sep 15, 2020, 07:29 AM IST
वैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प  title=
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : युनायटेड स्टेट्स अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प donald Trump  यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हवामान बदलांविषयी वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत येत्या काळात तापमान बऱ्याच अंशी खाली जाणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.  

कॅलिफोर्नियाचे नैसर्गिक संसाधन सचिव वेड क्रॉफूट यांच्या म्हणण्यानुसार, 'हवामानात होणाऱ्या बदलांविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करु इच्छितो. त्याचा वन संसाधनांच्या दृष्टीनेही फायदा होईल. या विज्ञानासोबत आपण सारे काम करुया. कारण, हाच पुढे एक मोलाचा मंत्र असेल. जर आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं आणि वेजिटेशन मॅनेजमेंटच सारंकाही आहे असं गृहित धरु लागलो तर कॅलिफोर्नियातील नागरिकांच्या संरक्षणार्थ आपण यशस्वी होणार नाही'. 

क्रॉफूट यांनी व्यक्त केलेल्या या चिंतातूर परिस्थितीवर उत्तर देत ट्रम्प म्हणाले, 'येत्या काळात थंडावा जाणवण्यास सुरुवात होईल, तुम्ही बघाच', ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, माझीही इच्छा होती की विज्ञान तुमच्याशी सहमत असतं....  असं वक्तव्य केलं. त्यावर ट्रम्प इथंच न थांबता मुळात विज्ञानाला हे सारं ठाऊक आहे की नाही याबाबतच शंका व्यक्त केली. 

 

वक्तव्यांमधील हा सूर पाहता स्पष्टपणे दिसणारं दुमत पाहता पुढं हिल यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांच्याकडे ट्रम्प यांनी बहुविध मतांचा आदर करण्याबाबतची विनंती केली. कॅलिफोर्नियामध्ये लागणारा वणवा, त्याचा नैसर्गिक संसाधनांपासून मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि एकंदरच हवामानात होणारे काही महत्त्वाचे बदल यांमुळं हा विषय चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं.