घराचं नूतनीकरण करताना तळघरात सापडला खजीना, एका क्षणात झाले मालामाल

घरात बसल्या बसल्या दाम्पत्याचं नशीब चमकलं, वाचा नेमकं काय घडलं

Updated: Feb 10, 2022, 09:16 PM IST
घराचं नूतनीकरण करताना तळघरात सापडला खजीना, एका क्षणात झाले मालामाल title=

Rich In A Moment : आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. विचार करा हे स्वप्न जर प्रत्यक्षात साकारलं गेलं तर. असंच काहीसं एका जोडप्यासोबत घडलं आहे. घरी बसल्या बसल्या हे जोडपं मालामाल झालं आहे. 

तळघरात सापडला खजिना
अमेरिकेतल्या ओहायो इथल्या क्लीव्हलँड इथे राहणारं हे जोडपं त्यांच्या घरातील तळघराचं नूतनीकरण करत होते.  तळघराची साफसफाई करत असताना पतीला तळघराच्या वरच्या बाजूला असलेल्या लाकडी फळ्यांमागे लपवलेल्या दोन सुटकेस दिसल्या.

त्याने त्या दोन्ही सुटकेस बाहेर काढल्या, सुरुवातीला त्या दोन सुटकेमध्ये स्पोर्ट्स कार्ड किंवा इतर काही जुन्या गोष्टी असतील असं त्याला वाटलं. सुटकेस जड असल्याने त्याने मदतीसाठी पत्नीला बोलावलं. 

सूटकेसमध्ये होते लाखो रुपये
पण जेव्हा या दोघांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. सुटकेसमध्ये कागदात गुंडाळलेली तीन पाकिटं होती. यासोबतच 25 मार्च 1951 च्या वृत्तपत्राची जुनी प्रत सापडली. जेव्हा त्यांनी ही गुंडाळी उघडली तेव्हा त्यात चक्क अमेरिकन डॉलर्स होते. पहिल्या सुटकेसमध्ये एकूण २३ हजार डॉलर्स म्हणजेच १७ लाख २४ हजार १३७ रुपये मिळाले.

उत्सुकते पोटी त्यांनी दुसरी सूटकेस उघडली तर त्यात यापेक्षाही जास्त पैसे होते. दुसऱ्या सुटकेसमध्ये त्यांना ४५ हजार डॉलर  म्हणजेच ३३ लाख ७३ हजार १५५ रुपये सापडले. इतके पैसे मिळाल्याने या जोडप्याचं नशीब एका क्षणार चमकलं.