डॉक्टरकडे गेलेल्या महिलेकडून घडला असा प्रकार, ज्यामुळे तिला भरावे लागले जास्तीचे पैसे

तुम्ही म्हणाल की, प्रत्येक डॉक्टर हा आपली कन्सल्टंट फी चार्ज करत असतो. मग यात काय इतकं विशेष.

Updated: May 24, 2022, 09:10 PM IST
डॉक्टरकडे गेलेल्या महिलेकडून घडला असा प्रकार, ज्यामुळे तिला भरावे लागले जास्तीचे पैसे title=

मुंबई : इंटरनेटवर विचित्र बातम्यांची कमतरता नाही. आपल्याला इथे नेहमीच वेगळं काही ऐकायला मिळतं. जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. येथे बरेच असे लोक आहेत. जे त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे सोशल मीडियावर शेअर करतात. जे नंतर चर्चेचा विषय ठरतात. आता, अमेरिकेतील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

न्यू यॉर्क शहरातील YouTuber, Camille Johnson एक फोटो आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला. हा फोटो एका डॉक्टरच्या कन्सल्टेशनच्या फी चा आहे. Camille Johnson ची बहीण जेव्हा, जानेवारीमध्ये डॉक्टरांकडे गेली होती. तेव्हा तिला डॉक्टरांनी बिल दिलं होतं, त्याचा हा फोटो होता.

आता तुम्ही म्हणाल की, प्रत्येक डॉक्टर हा आपली कन्सल्टंट फी चार्ज करत असतो. मग यात काय इतकं विशेष. तर तुम्ही जर हा फोटो नीट पाहिलत, तर तुम्हाला त्यामधील खरी गोष्ट समोर येईल.

खरंतर या बिलामध्ये डॉक्टरांनी महिलेच्या रडण्याचे बिलही बनवले आहे. हो तुम्हाला जरी हे खरं वाटत नसलं, तरी हे खरं आहे. डॉक्टरांनी महिला रडल्यामुळे तिला $40 (अंदाजे रु. 3000) फी लावली होती.

कॅमिलीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "माझी लहान बहीण अलीकडे खरोखरच मानसिक दृष्ट्या लढत आहे आणि शेवटी तिला डॉक्टरकडे जावे लागले. परंतु त्याने तिला रडण्यासाठी 40 डॉलर आकारले."

खरोखर हे प्रकरण सर्वांसाठीच धक्कादायक आहे, यामुळे Camille Johnson चं हे ट्वीट अनेक लोक शेअर आणि लाईक करत आहेत. एवढेच काय तर अनेल लोक या पोस्टवर भरभरुन कमेंट्स करत आहेत.